S M L

ललित मोदींसाठी ब्रिटीश सरकारकडे शिफारस केली नाही - सुषमा स्वराज

Samruddha Bhambure | Updated On: Aug 3, 2015 01:56 PM IST

271662-sushma

03 ऑगस्ट : ललित मोदी यांच्या ट्रव्हल डॉक्युमेंटसाठी आपण ब्रिटीश सरकारकडे कोणतीही शिफारस केलेली नाही. याप्रकरणी विरोधकांकडून करण्यात येणार आरोप निराधार असल्याचे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत स्पष्ट केलं.

ललित मोदी प्रकरणावरुन विरोधकांनी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. संसदेच्या कामकाजाला सुरुवात होताच दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. विरोधकांच्या प्रचंड गदारोळात सुषमा स्वराजांनी आपली बाजू मांडत आपण कधीही ललित मोदींना मदत केलेली नसून आपल्यावरील आरोप निराधार असल्याचं स्पष्ट त्यांनी केलं. तसंच ब्रिटिश सरकारकडे ललित मोदींच्या मदतीची शिफारस केली नसल्याची माहिती यावेळी सुषमा स्वराज यांनी दिली. मी आरोपांवर उत्तर देण्यासाठी दररोज संसदेत येते, पण विरोधक माझे उत्तर ऐकून घेण्याऐवजी फक्त गोंधळ घालत आहेत अशी टीका त्यांनी केली. सुषणा स्वराज उत्तर देत असताना विरोधकांनी राज्यसभा अध्यक्षांसमोर येऊन जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे राज्यसभेचं कामकाज तहकूब करावं लागलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 3, 2015 01:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close