S M L

खासदारांच्या निलंबनाविरोधात काँग्रेसची निदर्शनं

Samruddha Bhambure | Updated On: Aug 4, 2015 12:15 PM IST

खासदारांच्या निलंबनाविरोधात काँग्रेसची निदर्शनं

04 ऑगस्ट : सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्षांची लढाई आता सभागृच्या बाहेरही आली आहे. लोकसभेतील 25 खासदारांच्या निलंबनाविरोधात काँग्रेसचे नेते चांगलेच आक्रमक झाले असून थेट रस्त्यावर उतरलेत. स्वत: पक्षाध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी मनमोहन सिंह यांच्यासह काँग्रेसच्या नेत्याचा संसदेबाहेर धरणं आंदोलन करत मोदी सरकारचा निषेध करत आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेही आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.

सभागृहात कामकाज सुरु असताना प्रचंड गदारोळ घालणार्‍या काँग्रेसच्या 25 खासदारांचं काल (सोमवारी) लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी निलंबन केलं. त्याविरोधात काँग्रेस आणि संयुक्त जनता दल, तृणमूलसह 8 पक्षांनी आज (मंगळवारी) संसदेच्या कामकाजावर बहिष्कार टाकलाय. तसंच संतप्त झालेल्या काँग्रेसने हातावर काळ्या पट्‌ट्या बांधून तसंच फलक दाखवून निषेध केला.

तर दुसरीकडे, विरोधकांनी उत्तर देण्यासाठी रणनीती ठरवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक घेतली. भाजपचे लोसकभा आणि राज्यसभेतले खासदार याला उपस्थित होते. या विरोधकांच्या या तिढ्यामुळे जीएसटी, व्हिसलब्लोअर प्रोटेक्शन आणि रिअल इस्टेट विधेयकांचं भवितव्य टांगणीला लागलं आहे. गेल्या 11 दिवसांपासून पावसाळी अधिवेशनाचं कामकाज ठप्प झालंय. त्यात जनतेच्या 99 कोटी रुपयांचा चुराडा झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 4, 2015 12:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close