S M L

पाकिस्तानातूनच आले होते 26/11चे दहशतवादी - तारिक खोसा

Samruddha Bhambure | Updated On: Aug 4, 2015 09:20 PM IST

पाकिस्तानातूनच आले होते 26/11चे दहशतवादी - तारिक खोसा

arlagr

04 ऑगस्ट : मुंबईवर 26/11चा दहशतवादी हल्ला करणारे अतिरेकी पाकिस्तानातून आले होते, हे पाकिस्तानच्याच एका वरिष्ठ माजी पोलीस अधिकार्‍याने म्हटलेलं आहे. तारिक एम. खोसा यांनी काही दिवसांपूर्वी 'डॉन' या वृत्तपत्रात याबद्दलचा गौप्यस्फोट केला. पाकिस्तानच्या फेडरल तपास यंत्रणेचे ते माजी प्रमुख आहेत.

मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार झकी-उर-रहमान लख्वीला पाकिस्तानी कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर तारिक यांचा लेख 'डॉन'मध्ये प्रकाशित झाला होता. 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा कट पाकिस्तानातच शिजला होता आणि त्याची अंमलबजावणीही तिथूनच झाली होती. सिंध प्रांतात या कटाचं सेंटर होतं, याचे सात पुरावे आपल्याकडे असल्याचंही खोसा यांनी आपल्या लेखामध्ये म्हटलं आहे.पाकिस्तानने आता हे सत्य स्वीकारून आपल्या चुका मानण्याची गरज आहे, असंही त्यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे.

तारिक खोसा हे पाकिस्तानातील प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळखले जातात. बेनझीर भुत्तो हत्या प्रकरण आणि मेमोगेट प्रकरणाच्या चौकशीचं काम त्यांनी समर्थपणे सांभाळलं होतं. त्यानंतर, 26/11 हल्ल्याच्या तपासाची जबाबदारीही पाक सरकारनं त्यांच्यावर सोपवली होती. यादरम्यान, निदर्शनास आलेल्या अनेक गोष्टींवर तारिक खोसा यांनी लेखातून प्रकाश टाकला आहे. 26/11 हल्ल्यांच्यावेळी पकडण्यात आलेला एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाब हा पाकिस्तानी नागरिक असल्याचं खोसा यांनी सांगितलं आहे.

मुंबईवर हल्ला करणारे सगळे दहशतवादी पाकिस्तानातील होते, त्यांना पाकमध्येच प्रशिक्षण देण्यात आलं होतं, हल्ल्याचा कट रचण्यासाठी सिंध प्रांतात लॉजिस्टिक सेंटर उभारण्यात आलं होतं आणि हल्ल्याचे सूत्रधार कराचीत बसून दहशतवाद्यांना सूचना देत होते, हे सारं चौकशीतून समोर आलं आहे. माझ्याकडे असे सात मुद्दे आहेत, जे 26/11 हल्ल्यातील पाकचा सक्रिय सहभाग सिद्ध करतात. म्हणूनच, पाकिस्तान सरकारने आता कटू सत्याला सामोरं जावं आणि आपली चूक कबूल करावी, असं सडेतोड मत खोसा यांनी मांडलं आहे. मुंबई हल्ला खटल्याची सुनावणी वेगानं करून पीडितांनी न्याय द्यावा, अशी सूचनाही त्यांनी सरकारला केली आहे. त्यांच्या या लेखामुळे पाकिस्तानचा खोटारडेपणा पुन्हा जगासमोर आला आहे. त्यावर सरकार काय भूमिका घेतं, खरंच चूक कबूल करतं, की नवीच नौटंकी सुरू करतं, याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 4, 2015 09:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close