S M L

आणखी एक 'कसाब' पकडला

Samruddha Bhambure | Updated On: Aug 5, 2015 04:38 PM IST

आणखी एक 'कसाब' पकडला

05 ऑगस्ट : पाकिस्तानच्या नापाक इराद्याचा पुरावा भारतीय जवानांच्या हाती लागलाय. कारण एक दहशतवादी जिवंत भारताच्या हाती लागलाय. उधमपूरमधील जम्मू -श्रीनगर मार्गावर नरसूजवळ दहशतवादी आणि बीएसएफ जवानांमध्ये चकमक झाली. या चकमकीत एक दहशतवादी ठार झालाय तर एका दहशतवाद्याला जेरबंद करण्यात यश आलंय. या अतिरेक्याचं नाव उस्मान उर्फ कासिम खान आहे. आणि तो पाकिस्तानचा नागरिक असल्याचं समजतंय. उस्मान फक्त 20 वर्षांचा आहे.

उधमपूरच्या बीएसएफच्या तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात बीएसएफचे 2 जवान शहीद झालेत, तर 10 जवान जखमी झालेत. दहशतवाद्यांनी हल्ला करून 3 नागरिकांना ओलीस ठेवलं. त्यानंतर चकमक झाली आणि त्यात उस्मानला जिवंत पकडण्यात भारतीय लष्कराला यश आलं. उस्मान पाकिस्तानातल्या फैसलाबादचा आहे. उस्मान लष्कर-ए-तोय्यबाचा दहशतवादी आहे आणि गेल्या आठवड्यात पाकिस्तानमधून भारतात आला होता, अशी माहिती गुप्तचर संस्थांनी दिलीये.

या महिन्याच्या शेवटी भारत आणि पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांमध्ये चर्चा होतीये. या चर्चेला खीळ बसवणं हाच उधमपूरच्या हल्ल्यामागचा हेतू होता, असं सरकारमधल्या संस्थांनी सांगितलंय. पोलीस महानिरीक्षक, पोलीस उप महानिरीक्षक आणि गुप्तचर संस्थांमधल्या अधिकार्‍यांनी मिळून संयुक्तरित्या ही कारवाई केली.

विशेष म्हणजे मुंबईवर झालेल्या 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात अजमल कसाबला जिवंत पकडण्यात आलं होतं. कसाबनंतर आता उस्मान उर्फ कासिम खानला पकडण्यात आलंय. कसाब आणि उस्मान हे दोन्ही अतिरेकी विशीतले तरुण आहे. कसाबला फासावर लटकवण्यात आलं. आता उस्मान ताब्यात आल्यामुळे पाकच्या कारवायाविरोधातला जिवंत पुरावा हाती लागलाय.

कोण आहे उस्मान?

- वय : 20 वर्षं

- राहणार : फैसलाबाद(पाकिस्तान)

- लष्कर-ए-तोय्यबाचा सदस्य

- भाषा : उर्दु आणि पंजाबी

- घातपाताचं खास प्रशिक्षण

- आठवडाभरापूर्वी जम्मू आणि काश्मीरमध्ये प्रवेश

26-11 वर हल्ला करणारा अजमल कसाब आणि आता पकडण्यात आलेला उस्मान यांच्यातही बरंच साम्य आहे.

- जिवंत पकडलेले एकमेव अतिरेकी

- दोघांनीही लोकांना ओलीस धरलं

- दोघंही लष्कर-ए-तोएबाचे हस्तक

- दोघंही पाकिस्तानातून आले

- दोघंही विशीतले तरुण

उस्मानच्या अटकेनंतर काही प्रश्न उपस्थित होत आहेत

- उस्मानच्या अटकेनंतर अतिरेकी कारवायांमधला पाकिस्तानचा सहभाग उघड करता येईल का?

- पाकिस्तानची गुप्तचर संस्था असलेल्या ISIने या हल्ल्याचा कट रचला होता का?

- उस्मानच्या अटकेनंतर आता भारताने पाकपुरस्कृत दहशतवादाचा मुद्दा जागतिक पातळीवर मांडावा का?

- दोन्ही देशांमध्ये सुरक्षा सल्लागारांची चर्चा होऊ घातलीय. उधमपूरमध्ये झालेला हा हल्ला या चर्चेला खीळ बसवण्याचा हा प्रयत्न आहे का?

- 10 दिवसांतला हा दुसरा अतिरेकी हल्ला आहे. त्यामुळे उस्मान हा गुरदासपूरमध्ये हल्ला करणार्‍या गँगचाच अतिरेकी आहे का, असा ही प्रश्न उपस्थित होतोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 5, 2015 02:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close