S M L

पकडलेला अतिरेकी म्हणतो, 'दहशत पसरवण्यात मजा येते'

Sachin Salve | Updated On: Aug 5, 2015 07:02 PM IST

पकडलेला अतिरेकी म्हणतो, 'दहशत पसरवण्यात मजा येते'

05 ऑगस्ट : पाकिस्तानच्या नापाक हल्ल्याचा जिवंत पुरावा भारताच्या हाती लागलाय. उदमपूरमधून उस्मान ऊर्फ कासिम खानला पकडण्यात आलंय. पण, आपण पकडलो गेलो याची जरा सुद्धा भीती उस्मानला नाही. उलट दहशत पसरवण्यात आपल्याला मजा येते अशी कबुली त्याने दिली.

उस्मानला पकडण्यात आल्यानंतर मीडियाच्या प्रतिनिधींनी विचारपूस केली. त्यावेळी त्याने आपण पाकिस्तानमधूनच आलो अशी स्पष्ट कबुली दिली. कासिम म्हणतो, काश्मीरमध्ये लोकांवर अत्याचार केले जात आहे. त्यांना न्याय देण्यासाठी आपण इथं आलो असा खुलासा त्याने केला. अशी कामं का करतो ?, असं कासिमला विचारले असता हे अल्लाहचं काम आहे असं उत्तर त्याने दिलं. आपण 12 दिवसांपूर्वी पाकिस्तानातून भारतात आलो अशी कबुलीही त्याने दिली. मीडियाच्या प्रतिनिधींनी जेव्हा कासिमवर प्रश्नाची सरबती केली तेव्हा त्याच्या चेहर्‍यावर कुठलीही भीती नव्हती. उलट तो हसतखेळत पत्रकारांना उत्तर देत होता. कासिम उर्दू आणि पंजाबी भाषेत पत्रकारांशी बोलत होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 5, 2015 07:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close