S M L

सूड उगवण्यासाठी भारतात, दहशतवादी उस्मानची मग्रुरी

Samruddha Bhambure | Updated On: Aug 6, 2015 01:19 PM IST

सूड उगवण्यासाठी भारतात, दहशतवादी उस्मानची मग्रुरी

 

06 ऑगस्ट :भारतीयांवर सूड उगवण्यासाठी पाकिस्तानातून आलोय. लोकांना मारायला आणि दहशतवादी कारवाया करायला मला मजा येते, अशी धक्कादायक कबूली जम्मू-श्रीनगरच्या उधमपुरातून काल (बुधवारी) जिवंत ताब्यात घेतलेल्या दहशतवादी उस्मान खानने दिली आहे.

26/11च्या दहशतवादी हल्ल्यामध्ये अजमल कसाबला जिवंत पकडण्यात मुंबई पोलिसांना यश आलं होतं. त्यानंतर प्रथमच एखाद्या पाकिस्तानी दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात भारतीय सुरक्षा यंत्रणांना यश आलं आहे. अटक केल्यानंतरही त्याच्या चेहर्‍यावर कोणत्याही प्रकारची भीती किंवा आपण काही चुकीचे केले असल्याचे जाणवत नव्हते.

मी पाकिस्तानातून आलोय, माझ्यासोबत आलेले सहकारी मारले गेलं पण मी वाचलोये. दहशतवादी कारवाया करायला मला मजा येते. समजा मीही मारला गेलो तर ती अल्लाहची मर्जी असेल, असं वक्तव्य उस्मानने अटक झाल्यानंतर केलं.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास नॅशनल इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी म्हणजेच एनआयएकडे सोपवण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता उस्मानला तपासासाठी दिल्लीमध्ये नेलं जाणार आहे. उस्मानच्या सुरुवातीच्या चौकशीमध्ये असं आढळलं आहे की, दहशतवाद्यांनी अमरनाथ यात्रेला लक्ष्य करण्याचं षडयंत्र रचलं होतं. सूत्रांनी आयबीएनला दिलेल्या माहितीनुसार, आपण 45 दिवसांपूर्वीच भारतात आलो असल्याचं उस्माननं म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 6, 2015 01:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close