S M L

पाक तोंडघशी ; 'उस्मान माझाच मुलगा',वडिलांचा कबुलीनामा

Sachin Salve | Updated On: Aug 7, 2015 03:10 PM IST

usman urf kashim khan (8)06 ऑगस्ट : नापाक हल्लाचा जिवंत पुरावा भारताच्या हाती लागल्यामुळे पाकिस्तानचे धाबे चांगलेच दणाणले आहे. जिवंत पकडलेला अतिरेकी पाकिस्तानी नागरिक नाहीच असा दावा करणार पाकिस्तान सरकार चांगलंच थोंडघशी पडलंय. उधमपूरमध्ये जिवंत पकडण्यात आलेला दहशतवादी उस्मान ऊर्फ मोहम्मद नावेद हा पाकिस्तानीच असल्याचा आणखी एक पुरावा समोर आलाय. सीएनएन-आयबीएननं पाकिस्तानातल्या एका व्यक्तीशी बातचीत केली. त्यांनी आपण उस्मानचे वडील असल्याचं मान्य केलंय. मोहम्मद याकूब असं त्यांचं नाव आहे.

उस्मान भारताच्या तावडी सापडल्यामुळे आपल्या जीवाला धोका असल्याची भीतीही मोहम्मद याकूब यांनी व्यक्त केली आहे. तसंच लष्कर ए तोयबा आमच्या पाठीमागे आहे आणि पाकिस्तानचं सैन्यही आमच्या मागे लागलं असल्याचं मोहम्मद याकूब यांनी सीएनएन-आयबीएनशी बोलताना सांगितलंय. उस्माननं चौकशीदरम्यान वडिलांचा फोन नंबर दिला होता. दरम्यान, एनआयएनंही आता उस्मानची चौकशी सुरू केली आहे. त्यामधून अनेक नवीन गोष्टींचा खुलासा होतोय.

लहान शहर टार्गेट

भारतात घुसखोरी करण्यासाठी लष्कर-ए-तोयबा कोणत्या नव्या मार्गांचा वापर करत होते, याची माहिती उस्माननं दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी आता लहान शहरांवर लक्ष केंदि्रत करत आहेत. उधमपूरच्या हल्ल्याआधी दहशतवाद्यांनी तिथली टेहळणी केली होती. उस्माननं लष्कर-ए-तोयबाच्या 2 कॅम्पमध्ये दहशतवादाचं प्रशिक्षण घेतलं होतं. मनुष्यहानी वाढवण्यासाठी सुरक्षा दलांच्या ताफ्यांवर हल्ल्याची योजना आखण्यात आली होती. नवीन तरुणांची जास्तीत जास्त भरती करण्यासाठी दहशतवादी फक्त सुरक्षा दलांना लक्ष्य करणार होते. उस्मानला सूचना देणार्‍यांपैकी एक असलेला अबू कासिम दक्षिण काश्मीरमध्ये कारवाया करतो. 9 जूनला कासिम सुरक्षा यंत्रणांना गुंगारा देण्यात यशस्वी झाला. कासिम गेल्या 2 ते 3 वर्षांपासून काश्मीरमध्ये आहे. सीमा सुरक्षा दलांवरच्या हल्ल्याचा सूत्रधार कासिमच होता. कासिमला लष्कर-ए-तोयबानं प्रशिक्षण दिलंय आणि तो घुसखोरी करण्यासाठी नवीन भरती करत असतो अशी माहिती त्याने चौकशीत दिली.

उस्मान पाकिस्तानी नाहीच, पाकचा खोटारडेपणा

एकीकडे उस्मान नवनवे खुलासे करतोय. तर दुसरीकड़े पाकिस्तानची नकारघंटा सुरूच आहे. उस्मानच्या अटकेबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही. भारताने अधिकृत मार्गाने याची माहिती द्यावी आणि पुरावे सादर करावे, असं पाकिस्ताननं म्हटलंय. इतकंच काय पाकिस्तानने तर उस्मान पाकिस्तानी नागरिकच नाही, असं म्हटलंय. उस्मानला जेव्हा गावकर्‍यांनी पकडलं तेव्हा आपण 12 दिवसांपासून भारतात असल्याचं म्हटलं होतं. पण, तो 45 दिवसांपासून भारतात असल्याची सूत्रांची माहिती आहे.

राजनाथ सिंहांचं राज्यसभेत निवेदन

अतिरेक्याला जम्मूला नेण्यात आलंय आणि त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज राज्यसभेत दिली. या ऑपरेशनमध्ये बीएसएफ ,जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफची महत्त्वाची भूमिका आहे असं ते यावेळी म्हणाले. या अतिरेक्यांकडून सीमेपलीकडून होणार्‍या घुसखोरीविषयी निश्चित माहिती मिळेल असंही त्यांनी सांगितलंय. तसंच या अतिरेक्यांकडून 2 एके 47, ग्रेनेड आणि दाररुगोळ जप्त केल्याची माहिती राजनाथ सिंह यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 6, 2015 10:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close