S M L

याकूबच्या फाशीचा बदला घेणार - टायगर मेमनची धमकी

Samruddha Bhambure | Updated On: Aug 7, 2015 05:32 PM IST

याकूबच्या फाशीचा बदला घेणार - टायगर मेमनची धमकी

07 ऑगस्ट : 1993च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार टायगर मेमननं याकूबच्या फाशीच्या दिवशी कुटुंबीयांना फोन केल्याची माहिती समोर आलीय. नागपूर जेलमध्ये 30 जुलैला जेव्हा याकूब मेमनला फाशी दिली जात होती, त्याच्या काही तास आधी टायगर मेमननं आपल्या मुंबईतील घरच्या लँडलाइनवर फोन करून आईशी बातचीत केल्याचा गौप्यस्फोट 'इकॉनॉमिक्स टाईम्स' या दैनिकाने केला आहे.

याकूबच्या फाशीचा बदला घेणारच अशी धमकी याकूबचा भाऊ आणि गेल्या 22 वर्षांपासून भारतासाठी मोस्ट वॉन्टेड असलेला मुंबईमध्ये 1993च्या बॉम्बस्फोट मास्टर माईंड टायगर मेमनने दिली आहे. याकूबला फाशी देण्याच्या दिड तासा आधी टायगरने मुंबईत आईशी बोलल्याचं समोर आलं आहे. मात्र मुंबई पोलिसांनी या बातमीवर आजूनही दुजोरा दिलेला नाही.

सुरुवातीला याकूबची आई हनिफा फोनवर बोलताना घाबरत होत्या. पण मेमन कुटुंबातील एका सदस्यांनी 'भाईजान'शी बोल असा आग्रह केल्यानंतर हनिफा या मोकळेपणाने बोलू लागल्या. टायगरने आईशी बोलताना वारंवार याकूबच्या फाशीचा बदला घेण्याची धमकी दिली. आई तू रडू नको, याकूबच्या फाशीची किंमत त्यांना चुकवावी लागेल' असं टायगर म्हणाला. यावर त्याची आई हनिना म्हणाल्या, बस्स करा हा हिंसाचार. या सगळ्यात माझा एक मुलगा गेला, आता आणखी बघू शकत नाही'. दरम्यान, त्यांच्यात फक्त तीन मिनीटं बोलणं झालं असून हा कॉल वॉईस इंटरनेट प्रोटोकॉलने केला होता. त्यामुळे त्याचा आयपी ऍड्रेस ट्रेस होण्यास अडचणी येत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 7, 2015 10:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close