S M L

सुषमा स्वराज ड्रामेबाज- सोनिया गांधी

Samruddha Bhambure | Updated On: Aug 7, 2015 03:04 PM IST

सुषमा स्वराज ड्रामेबाज- सोनिया गांधी

07 ऑगस्ट : काँग्रेस खासदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ सलग चौथ्या दिवशी काँग्रेसच्यावतीने आज संसदेबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यावर निशाणा साधला. सुषमा स्वराज ड्रामेबाज असून, नाटक करण्यात त्या पटाईत असल्याचं सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.

ललित मोदी यांना मदत केल्याप्रकरणात सुषमा स्वराज यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप गुरुवारी फेटाळून लावले. ललित मोदी यांना मदत केल्याचा एकतरी पुरावा विरोधकांनी आणून द्यावा, असं आव्हानही त्यांनी विरोधकांना दिलं आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना सोनिया गांधी यांनी सुषमा स्वराज यांच्यावर निशाणा साधला. नाटक करण्यात सुषमा स्वराज पटाईत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर या प्रकरणावरून सुषमा स्वराज नाटक करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी सांगितलं.

राहुल गांधींनीही सुषमा स्वराज यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सोनिया गांधी माझ्या जागी असत्या तर त्यांनी हेच केलं असतं, असं काल सुषमा स्वराज म्हणाल्या होत्या. त्यावर सोनिया गांधी यांनी असं नक्कीच केलं नसतं, असं राहुल म्हणालेत.

दरम्यान, राज्यसभेतील काँग्रेसच्या सर्व खासदारांना सभागृहात हजर राहण्याचे आदेश सोनिया गांधी यांनी दिले आहेत. खासदारांच्या गैरहजेरीचा गैरफायदा घेत मोदी सरकार विधेयक मंजूर करण्याची शक्यता असल्याने गांधी यांनी हे आदेश दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 7, 2015 02:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close