S M L

काश्मीरमध्ये पुन्हा आयसिसचे झेंडे,'IS JK IS COMING' !

Sachin Salve | Updated On: Aug 7, 2015 10:00 PM IST

काश्मीरमध्ये पुन्हा आयसिसचे झेंडे,'IS JK IS COMING' !

07 ऑगस्ट : सीमारेषेवर घुसखोरी आणि दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर आता काश्मीरमध्ये दहशतवादी संघटना आयसिसचं संकट वेगाने रुप घेताना दिसत आहे. आज (गुरुवारी) काश्मीरमध्ये पुन्हा एकदा आयसिसचे झेंडे फडकवण्यात आले. 'IS JK IS COMING' आयसिस लवकरच जम्मू काश्मीरमध्ये येत आहे असा मजकूर त्या झेंड्यांवर लिहलेला होता.

गेल्या काही महिन्यात काश्मीरमध्ये अशा प्रकारे झेंडे फडकावण्याच्या घटना वारंवार घडतायत. याला फुटीरवादी नेते जबाबदार असल्याचा आरोप होतोय. आज बुरखाधारी तरुणांच्या एका गटानं पाकिस्तान, आयसिस आणि लष्कर-ए तोयबाचे झेंडे श्रीनगरच्या नोव्हाटा भागात फडकावले. हुरियतचा नेता मिरवाईझ उमर फारुक याने या भागात सामुदायिक प्रार्थना आयोजित केली होती. त्यावेळी ही घटना घडली. गेल्या काही घटनांचा आढावा घेतला तर प्रत्येक शुक्रवारी जम्मू-काश्मीरमध्ये 'जुमे की नमाज' च्या नंतर दहशतवादी संघटना आयसिस आणि पाकिस्तानचे झेंडे फडकावले जात आहे. पोलिसांनी जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावरच दगडफेक करण्यात आली.

जुलै महिन्यात 3 वेळा आयसिसचे झेंडे फडकवण्यात आले होते. सर्वात पहिले 17 जुलैला याच नोव्हाटा भागात आयसिसचे झेंडे फडकावले होते. त्यानंतर 24 जुलैला श्रीनगरमध्ये दुसर्‍यांदा अशीच घटना घडली होती. त्यावेळी जामिया मस्जिदमध्ये नमाज झाल्यानंतर काही लोकं इस्लामिक स्टेटचे झेंडे घेऊन आढळले होते. त्यानंतर 31 तारखेला याच ठिकाणी पुन्हा हाच प्रकार पाहण्यास मिळाला.

फारूख अब्दुल्ला भेटीला

दरम्यान, नॅशनल कॉन्फरंसचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांनी आज जम्मूच्या पूंछ भागाला भेट दिली. या भागात गेल्या तीन दिवसांपासून पाकिस्तानकडून गोळीबार झालाय. पण, राज्य किंवा केंद्र सरकारच्या कुण्याही प्रतिनिधीने तिथे भेट दिलेली नाही. फारूख अब्दुल्ला यांनी

तिथल्या रहिवाशांच्या सोबत असल्याचं त्यांनी सांगितलं.

पुन्हा उधमपूरमध्ये दहशतवादी हल्ला

तर, उधमपूरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर उधमपूर जिल्ह्यामध्ये काल रात्री पुन्हा दहशतवाद्यांनी हल्ला केला. यावेळी त्यांनी बसंतगडमधल्या पोलीस चौकीला लक्ष्य केलं. काल रात्री 9च्या सुमाराला दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याला पोलिसांनी चोख प्रत्युत्तर दिलं. यामध्ये 2 पोलीस जखमी झाले. त्यानंतर आज सकाळपासून कोणताही हल्ला झालेला नाही. मात्र, या भागामध्ये 4 ते 5 दहशतवादी लपून बसले असावेत असा अंदाज आहे.

लष्कर, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि पोलिसांनी हा भाग रिकामा केला. आणि दहशतवाद्यांचा तपास सुरू केला. बुधवारी उधमपूरमध्येच उस्मान खान आणि त्याच्या साथीदारानं दहशतवादी हल्ला केला होता. त्यानंतर दोनच दिवसांनी पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाल्यानं जम्मू आणि काश्मीरमध्ये कारवाया वाढल्याचं मानलं जातंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 7, 2015 10:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close