S M L

जंगलराज हटावो, मोदींचे गयातील परिवर्तन रॅलीत आवाहन

Samruddha Bhambure | Updated On: Aug 9, 2015 04:58 PM IST

narendra modi

09 ऑगस्ट : जंगलराज पार्ट-2 हटावो, असं आवाहन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधल्या जनतेला केलं आहे. भाजपने बिहार विधानसभेच्या निवडणूकीचं रणशिंग फुंकलंय. त्यापार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (रविवारी) गयामध्ये जाहिर सभा घेऊन प्रचाराचा नारळ फोडला. नरेंद्र मोदींच्या या पहिल्याच सभेला गयामध्ये लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी नरेंद्र मोदी यांनी नितीशकुमार आणि लालू प्रसाद यादव यांना टार्गेट करत सडकून टीका केली.

आरजेडी म्हणजे रोजाना जंगलराज तर जदयू म्हणजे जनता का दमन, असा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्रा मोदींनी राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) आणि संयुक्त जनता दल (जेडीयू) या दोन्ही पक्षांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तोफ डागली. बिहारमध्ये सध्या जंगलराज सुरू आहे. गेल्या 25 वर्षांपासून बिहारला बर्बाद करणार्‍यांच्या हातात पुन्हा सत्ता देऊन नका असं आवाहन करत मोदींनी नितीश कुमारांवर जोरदार टीका केली.

बौद्धगया बाँबस्फोटावर चिंता व्यक्त करत या शहराला जागतिक दर्जा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन मोदींनी दिले. आंतरराष्ट्रीय स्तरावर या शहराचे काय महत्त्व आहे, हेही पंतप्रधानांनी यावेळी जनतेला समजावून सांगितलं.

'अब दिल्ली बिहार के साथ है, आपकी सेवा मे तैनात है', असं सांगत मोदींनी बिहारला विकासाची हमी दिली. लोकसभा निवडणुकीत आपण जे प्रेम दिले त्याची सव्याज परतफेड करायची आहे. आता तुम्ही परिवर्तन घडवण्याची गरज आहे. परिवर्तन घडवा. राज्यात नवे सरकार आणा. विकासाची खात्री मी देतो, अशा शब्दात मोदींनी बिहारी जनतेला आश्वस्त केलं. भाजपने मध्य प्रदेश, राजस्थान या 'आजारी' राज्यांना विकासाच्या वाटेवर आणलं आहे. तुम्ही आशीर्वाद दिल्यास बिहारलाही आम्ही आजारमुक्त करू, असंही मोदी म्हणाले.

दिल्लीतून विकासाची गंगा वाहत आहे पण राज्यातले सरकार आड येत आहे. त्यांचा लोटा उलटाच आहे, असा टोलाही मोदींनी हाणला. येणारी निवडणूक जंगलराजची मुक्ती करणारे पर्व ठरोत, अशी अपेक्षाही मोदींनी व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 9, 2015 04:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close