S M L

कमी पाऊस झालेल्या भागातील शेतकर्‍यांना डिझेलवर 50 टक्के सबसिडी ?

Sachin Salve | Updated On: Aug 12, 2015 09:24 AM IST

कमी पाऊस झालेल्या भागातील शेतकर्‍यांना डिझेलवर 50 टक्के सबसिडी ?

12 ऑगस्ट : दुष्काळग्रस्त भागातल्या शेतकर्‍यांसाठी एक दिलासा देणारी बातमी...ज्या भागात पाऊस कमी झालाय तिथल्या शेतकर्‍यांना डिझेलवर 50 टक्के सबसिडी देण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे.

आर्थिक व्यवहारांवरच्या केंद्रीय समितीची आज बैठक होणार आहे. कृषीखात्याच्या वतीनं हा सबसिडीचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. पाऊस कमी झालाय त्या ठिकाणा खरीपाची पिकं वाचवण्यासाठी ही डिझेलवरची सबसिडी देण्याचा कृषी खात्याचा विचार आहे. यंदा महाराष्ट्रसह देशभरात पावसाने अववेळी हजेरी लावल्यामुळे शेतकर्‍यांचे हाल झाले आहे.

राज्यात तर अवकाळी, गारपीट आणि पाणी टंचाईमुळे शेतकरी चिंतेत आहे. यंदाचा मान्सूनही प्रतिकूल नसल्यामुळे हातची पिकं जळून गेलीये. केंद्रीय पथक दुष्काळी भागाची पाहणी करत आहे. पण केंद्राने आता आणखी एक दिलासा दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 12, 2015 09:24 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close