S M L

'प्रधानमंत्री संसद में आयो', संसदेबाहेर काँग्रेसची जोरदार निदर्शनं

Sachin Salve | Updated On: Aug 13, 2015 02:31 PM IST

'प्रधानमंत्री संसद में आयो', संसदेबाहेर काँग्रेसची जोरदार निदर्शनं

congress protest sansad13 ऑगस्ट : काल लोकसभेत गदारोळानंतर आजही संसदेबाहेर काँग्रेसने जोरदार निदर्शनं केली. एनडीए आणि भाजपविरोधात संसदेतल्या गांधी पुतळ्याजवळ काँग्रेसने जोरदार घोषणाबाजी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसचे खासदारही या आंदोलनात सहभागी झाले होते. राहुल गांधीही या आंदोलनात आघाडीवर होते. 'प्रधानमंत्री संसद में आयो', अशा घोषणा या खासदारांनी दिल्या.

काळा पैसा आणि राजकीय यंत्रणा यात ललित मोदी हा दुवा आहे, असा आरोपही यावेळी राहुल गांधी यांनी केला. इतकंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावरही राहुल गांधी यांनी जोरदार टीका केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 13, 2015 02:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close