S M L

नापाक हल्ल्यांमुळे सीमेवर कटुता, यंदा मिठाईची देवाण घेवाण नाही !

Sachin Salve | Updated On: Aug 13, 2015 04:32 PM IST

नापाक हल्ल्यांमुळे सीमेवर कटुता, यंदा मिठाईची देवाण घेवाण नाही !

13 ऑगस्ट : शस्त्रसंधीचं उल्लंघन आणि गुरदासपूरचा दहशतवादी हल्ला, या कारणांमुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये संबंध ताणले गेले आहे. त्यामुळे या वर्षी सीमेवर मिठाईची देवाणघेवाण न करण्याचा निर्णय भारतीय लष्कराने घेतलाय.

दरवर्षी 14 ऑगस्ट म्हणजे पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी आणि 15 ऑगस्ट म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यदिनी सीमा सुरक्षा बल आणि पाकिस्तानी रेंजर्समध्ये मिठायांची देवाणघेवाण होत असते. पण पाकिस्तानकडून सतत गोळीबार होत असल्याने या वर्षी ही परंपरा न पाळण्याचा निर्णय बीएसएफने घेतलाय. बीएसएफचे महानिरीक्षक अनिल पालीवाल यांनी ही माहिती दिलीय. पण दरवर्षी प्रमाणे काही सामाजिक संघटना सीमेवर मेणबत्या मात्र लावणार आहेत. मागील महिन्यात ईदसाठीही भारतीय जवानांनी पाकिस्तानी सैनिकांनी मिठाई दिली होती. पण, पाक सैनिकांनी मिठाई नाकारली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 13, 2015 04:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close