S M L

नितीन गडकरी भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष

19 डिसेंबरभारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन गडकरी यांच्या नावाची अधिकृत घोषणा राजनाथ सिंग यांनी केली. नवी दिल्लीमधील भाजप मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. 24 डिसेंबरला गडकरी पक्षाच्या अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेणार आहेत. या पत्रकार परिषदे बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, मी सामान्य कार्यकर्ता आहे. माझ्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे. तसेच अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांचं मार्गदर्शन घेत राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. भाजपाचा पुढील अध्यक्ष हा दिल्ली बाहेरचा असेल. असं सुचक वक्तव्य काहीच दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत यांनी केलं होतं. त्यानुसार भारतीय जनता पक्षात बदलांना शुक्रवार पासुन सुरुवात झाली. सुषमा स्वराज या लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या झाल्या. तर अरूण जेटली हे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते झाले. या पत्रकार परिषदेच्या वेळी लालकृष्ण अडवाणी, राजनाथ सिंग, सुषमा स्वराज, व्यक्कैया नायडू, अरूण जेटली हे दिग्गज नेते हजर होते. नितीन गडकरी यांची कारकिर्द : 27 मे 1957 ला नागपुरात जन्मलेल्या नितीन जयराम गडकरी यांच घर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयापासून जवळच आहे. त्यामुळे बालपणापासूनच गडकरी संघाच्या शाखेत जाऊ लागले. स्वयंसेवकाचे बाळकडू मिळालेल्या गडकरींनी भाजप आणि संघाच्या सर्व प्रकारच्या जबाबदार्‍या निष्ठेने आणि कार्यक्षमतेने पार पाडल्या. संघ स्वयंसेवक ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष ही त्यांची कारकीर्द यशस्वी ठरली. M.com., L.L.B. आणि D.B.M. असं शिक्षण घेतलेले गडकरी 1989 पासून विधानपरिषदेचे आमदार आहेत. युती सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद भूषवलेल्या गडकरींनी महाराष्ट्रभर उड्डाणपूल बांधून आपला कायमचा ठसा उमटवला आहे. विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेतेपदही त्यांनी अभ्यासूपणे गाजवलं. उद्योगव्यवसायातही गडकरींनी चांगलीच भरारी घेतली आहे. पूर्ती उद्योग प्रकल्पाचे अध्यक्ष, अंत्योदय सहकारी प्रकल्पाचे संस्थापक, पॉलिसॅक इंडस्ट्रीजचे संस्थापक संचालक अशी उद्योगातली यशस्वी बिरूदं ते मिरवतायत. आधुनिक शेती, फळ -निर्यात, पाणीव्यवस्थापन, सौरउर्जा प्रकल्प अशा प्रकल्पांमध्येही गडकरी अग्रेसर आहेत. अशा या कार्यक्षम नेत्यापुढे आता मोठं आव्हान आहे ते भाजपला नवी उभारी देण्याचं.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 19, 2009 11:39 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 19, 2009 11:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close