S M L

पाकच्या कुरापत्या सुरूच, आधी शुभेच्छा नंतर सीमेवर गोळीबार !

Sachin Salve | Updated On: Aug 15, 2015 10:56 PM IST

पाकच्या कुरापत्या सुरूच, आधी शुभेच्छा नंतर सीमेवर गोळीबार !

15 ऑगस्ट : आज भारताच्या स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानने आपली मुजोरी सुरूच ठेवली. एकीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ

भारताला शुभेच्छा देत आहे तर दुसरीक डे सीमेवर गोळीबार सुरू आहे. पाक सैनिकांनी सीमेवर केलेल्या गोळीबारात चार नागरिक ठार झाले आहे.

देशभरात आज स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाला. पण, सीमेवर पाकची दुखणी सुरूच आहे. आजच्या दिवशीही सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. जम्मू आणि काश्मीरमध्ये पूंछ जिल्ह्याच्या बालाकोट भागात पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात चार नागरिक ठार तर 16 जण जखमी झाले आहेत. हा गोळीबार अजूनही सुरूच आहे. याशिवाय मंडी सॉजिया या भागात सकाळी पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार तसंच उखळी तोफांचा मारा करण्यात आला. दरम्यान, पाकिस्तानी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त भारताला शुभेच्छा दिल्या. पण, काही तास उलट नाही तेच सीमेवर गोळीबार करण्यात आला. विशेष म्हणजे पाकिस्तानाच अतिरेकी मोहम्मद नावेद उर्फ उस्मानाला भारताने पकडले. त्यानंतर पाकचे धाबे चांगलेच दणाणले आहे. गेल्या काही दिवसांपासून सीमेवर वारंवार गोळीबार सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 15, 2015 10:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close