S M L

सुप्रीम कोर्ट बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Samruddha Bhambure | Updated On: Aug 18, 2015 03:24 PM IST

Supreme court of india

18 ऑगस्ट : सुप्रीम कोर्टाची इमारत बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल आल्याने दिल्लीत खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर कोर्टाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून या परिसरात हाय अलर्टत्याचबरोबर सुरक्षेच्या कारणास्तव इंटर्न वकिलांना कोर्टात प्रवेश बंद करण्यात आला आहे.

हा धमकीचा ई-मेल मागच्या आठवडय़ात आला. त्यानंतर याबाबत दिल्ली पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या सुरक्षेत मोठय़ाप्रमाणावर वाढ करण्यात आली. दरम्यान, याकूब मेमनच्या फाशीनंतर सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश दीपक मिश्रा यांना 7 ऑगस्ट रोजी जीवे मारण्याची धमकी देणारं निनावी पत्र आलं होतं. त्यानंतर आता सुप्रीम कोर्टाची इमारत बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणार ई-मेल आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 18, 2015 01:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close