S M L

आमदारांना यापुढे रेल्वेत करावा लागणार सर्वसामान्याप्रमाणेच प्रवास !

Sachin Salve | Updated On: Aug 22, 2015 09:30 PM IST

323rail_budget201422 ऑगस्ट : भारतात प्रवासासाठी स्वस्तात मस्त अशा रेल्वेची सवारी आता आमदारासाहेबांना मिळणार नाही. कारण व्हीआयपी' दारातून आमदारासाहेबांची एंट्री आता बंद करण्यात आलीये. रेल्वे मंत्रालयाने आमदारांना व्हिआयपी यादीतून वगळलं आहे. त्यामुळे आमदारांना सर्वसामान्याप्रमाणेच प्रवास करावा लागणार आहे. 21 ऑगस्टला रेल्वे बोर्डाने अध्यादेश काढलाय. रेल्वे आरक्षणाचा चार्ट तयार करतांना आता आमदारांचा प्राधान्य नाही. तसंच व्हिआयपी यादीत आता केवळ पुरस्कार विजेते,खासदार, हायकोर्ट न्यायाधीश,मंत्री यांचाच सहभाग असणार आहे.

आमदारांना मिळत होत्या या सवलती

मोफत रेल्वे कूपन

राज्यात कितीही किलोमीटरचा रेल्वे प्रवास मोफत

राज्याबाहेर 30 हजार रुपयांपर्यंत मोफत प्रवास

AC- टू टायर प्रवास, सोबत एक PA

विमानाच्या 24 फेर्‍यांचा प्रवास मोफत

आता रेल्वे व्हीआयपी यादीत कोण ?

खासदार

खासदाराची पत्नी

एक मदतनीस

हायकोर्टाचे न्यायाधीश आणि मंत्री

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 22, 2015 09:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close