S M L

आंध्रमध्ये ट्रकची रेल्वेला धडक, 5 ठार

Sachin Salve | Updated On: Aug 24, 2015 08:31 AM IST

आंध्रमध्ये ट्रकची रेल्वेला धडक, 5 ठार

24 ऑगस्ट : आंध्रप्रदेशमधील अनंतपूर जिल्ह्यातील पेनूकोंडाजवळ रेल्वे क्रॉसिंगच्या वेळी एक्स्प्रेसवर ट्रक आदळून झालेल्या अपघातात 5 जणांचा मृत्यू झालाय. या अपघातात पाच जणांसह कर्नाटकतील काँग्रेसचे आमदार व्यंकटेश नायक यांचा मृत्यू झाला.

पेनूकोंडाजवळ रेल्वे क्रॉसिंगच्या दरम्यान धावत्या बँगलोर-नांदेड एक्स्प्रेसवर भरधाव ट्रक येऊन आदळला. रेल्वेच्या एसी बोगीवर हा ट्रक़ धडकला. या ट्रकमध्ये ग्रेनाईट दगड होता. ट्रॅक रेल्वेवर धडकेनंतर हा दगड प्रवाशांना लागला. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला तर 6 जण गंभीर जखमी झाले. रेल्वेच्या अधिकार्‍यांनी या ट्रकचे ब्रेक निकामी झाले होते त्यामुळे हा अपघात घडला अशी माहिती दिली. दुर्देवाने या अपघातात कर्नाटक येथील काँग्रेसचे आमदार व्यंकटेश नायक यांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन प्रवाशी, ट्रक ड्रायव्हर आणि एक रेल्वे कर्मचार्‍याचा सहभाग आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 24, 2015 08:31 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close