S M L

संथारा प्रथेवरील बंदीविरोधात जैनधर्मियांचा देशव्यापी बंद

Sachin Salve | Updated On: Aug 24, 2015 11:47 AM IST

संथारा प्रथेवरील बंदीविरोधात जैनधर्मियांचा देशव्यापी बंद

24 ऑगस्ट : जैन समाजातल्या संथारा ही प्रथा बंद करा असा आदेश राजस्थान कोर्टाने दिलाय. या निर्णयाविरोधात जैन धर्मियांकडून देशव्यापी बंद आणि मूक मोर्चांचं आयोजन करण्यात आलेलं आहे.

एक दिवस व्यावसायिक काम बंद ठेवणे, ऑफिसमधूनही एक दिवसाची सुट्टी घेणे आणि विद्यार्थ्यांना शाळेत न पाठवण्याबाबत जैन धर्मियांना आवाहन करण्यात आलेलं आहे. या निर्णयाचा फेरविचार व्हावा, या मागणीसाठी हे आंदोलन आहे. जैन धर्मातील संथारा या प्रथेनुसार व्यक्तीला मृत्यू येईपर्यंत उपवास करण्याची परवानगी असते. पण ही प्रथा मानवी हक्काला धरून नसून ती जगण्याच्या अधिकाराचे उल्लंघन करते, अशी जनहित याचिका 2006 साली न्यायालयासमोर दाखल केली होती. संथारा प्रथेवर बंदी घालणारा निर्णय हा केवळ राजस्थानपुरताच मर्यादित असला तरी त्यामुळे देशभरातील जैन समाजात अस्वस्थता आहे. दरम्यान, पुण्यातही जैन धर्मियांनी आंदोलन राजस्थान कोर्टाच्या निर्णयाविरोधात आंदोलन केलं. पुण्यात जैन समाजाच्या वतीने मूकमोर्चा काढण्यात आला. या निर्णयांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जाऊ असंही त्यांनी म्हंटलंय. राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं.

संथारा हा व्रत नेमका काय असतो ?

"जैन धर्मियांच्या मते संथारा व्रत म्हणजे ईश्वर प्राप्ती, मोक्षाचं साधन संथारा व्रत घेतलेली व्यक्ती अन्न-पाण्याचा त्याग करते आणि मृत्युपर्यंत मौनव्रत ठेवते आपल्या हातून झालेल्या चुकांचं परिमार्जन करण्यासाठीचा मार्ग म्हणजे संथारा व्रत."

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

-

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 24, 2015 11:47 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close