S M L

हिंदूंची लोकसंख्या घटली तर मुस्लिमांच्या लोकसंख्येत वाढ

Samruddha Bhambure | Updated On: Aug 25, 2015 10:29 PM IST

हिंदूंची लोकसंख्या घटली तर मुस्लिमांच्या लोकसंख्येत वाढ

25 ऑगस्ट : देशाच्या धर्मनिहाय जनगणनेचा अहवाल जाहीर झाला आहे. 2011 च्या जनगणनेनुसार देशात हिंदूंच्या लोकसंख्येत घट झाल्याची नोंद अहवालात करण्यात आली आहे. तर मुस्लीम लोकसंख्येत वाढ झाल्याचंही नमूद करण्यात आलं आहे. देशातल्या हिंदू लोकसंख्येचे प्रमाण 0.7 टक्क्यांनी घसरले असून मुस्लीम लोकसंख्येत 0.8 टक्क्यांची वाढ झाली आहे. याशिवाय, एकूण लोकसंख्येत ख्रिश्चनांचे प्रमाण 2.3 टक्के तर शीख बांधवांचे प्रमाण 1.7 टक्के आहे तर बौद्ध वर्गाचे प्रमाण 0.7 टक्के इतके आहे.

2011 च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार देशाची लोकसंख्या 121 कोटी 9 लाखांच्या घरात गेली आहे. एकूण लोकसंख्येपैकी देशात हिंदूंची लोकसंख्या 96 कोटी 63 लाख इतकी असून, देशात 17 कोटी 22 लाख मुस्लीम नागरिक आहेत.

  • 2011 ची धर्मावर आधारित जनगणना

हिंदूधमिर्यांची संख्या - 93 कोटी 63 लाख

मुस्लीमधमिर्यांची संख्या - 17 कोटी 22 लाख

ख्रिश्चनधमिर्यांची संख्या - 2 कोटी 78 लाख

बौद्धधमिर्यांची संख्या - 84 लाख

जैनधमिर्यांची संख्या - 45 लाख

  • धर्मावर आधारित जनगणना : 2011 ची जनगणना

हिंदूधमिर्यांची लोकसंख्या 0.9 टक्क्यांनी कमी

मुस्लीमधमिर्यांची लोकसंख्या 0.8 टक्क्यांनी वाढली

शिखांची लोकसंख्या 0.2 टक्क्यांनी कमी

बौद्धधमिर्यांची लोकसंख्या 0.2 टक्क्यांनी कमी

जैन आणि ख्रिश्चनांच्या संख्येत चढउतार नाही

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 25, 2015 09:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close