S M L

गुजरातमध्ये संचारबंदी, शाळा-काॅलेज,इंटरनेट बंद

Sachin Salve | Updated On: Aug 26, 2015 01:13 PM IST

गुजरातमध्ये संचारबंदी, शाळा-काॅलेज,इंटरनेट बंद

26 ऑगस्ट : पटेल समाजाला आरक्षण द्यावं या मागणीसाठी छेडण्यात आलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलंय. आंदोलनांचं नेतृत्व करणार्‍या हार्दिक पटेल यांना अटक केल्यामुळे गुजरातमधल्या राजकोट, बडोदा, सुरत या शहरांमध्ये आणि इतरही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार उसळला. त्यामुळे सुरत आणि मेहसाणामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आज सकाळी बडोदा आणि अहमदाबादच्या काही भागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आलीय.

अहमदाबादमधल्या रॅलीला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर हार्दिक पटेल आणि त्याचे 3 साथीदार जीएमडीसी ग्राउंडमध्ये उपोषणाला बसले. त्यांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात समर्थक जमले होते. त्यांना हुसकावून देण्यासाठी पोलीस आले. त्यातच रात्री आठच्या सुमाराला पोलिसांनी लाठीमार केला आणि नंतर हार्दिक पटेलला ताब्यात घेतलं.

मात्र, त्याची हिंसक प्रतिक्रिया उमटल्यानंतर पोलिसांनी त्यांना सोडून दिलं होतं. पण हा वणवा जास्त पेटला. गुजरामध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्यात. राजकोटस सुरेंद्रनगर, वडोदरा, अमरेली जिल्हात तोडफोड करण्यात आलीये. पटेल यांच्या समर्थकांची ही तोडफोड केलीये. काही ठिकाणी पटेल समर्थकांनी बसेसची तोडफोड करून पेटवून दिल्या आहे. बडोदा आणि अहमदाबादमध्ये काही भागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आलीये.

गुजरात बंद

पटेल समाजाच्या आंदोलनानं काल रौद्ररूप धारण केलं, आणि त्याचेच पडसाद म्हणून आज गुजरात बंद आहे. अहमदाबादमध्ये शाळा बंदची घोषणा कालच करण्यात आली होती. काही शहरांमध्ये तणावाचं वातावरण अजूनही कायम आहे. मेहसाणा आणि सूरतमध्ये संचारबंदी लागू आहे. पटेल समाजाला ओबीसी दर्जा द्या, आणि त्याप्रमाणे शिक्षण आणि नोकरीत आरक्षण द्या, अशी पटेल समाजाची प्रमुख मागणी आहे.

इंटरनेट बंद

गुजरातमध्ये सरकारनं इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचे आदेश टेलिकॉम कंपन्यांना देण्यात आलेत. हल्ली सोशल मीडियावरून लगेच संदेश पसरतात, पोहोचतात आणि यामुळे जनतेला एका ठिकाणी एकत्र आणणं खूप सोपं होतं. म्हणूनच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सरकारनं हे पाऊल उचललंय. काल अहमदाबादमध्ये जमलेला जनसागर पाहूनच सरकारनं ही कारवाई केली असावी पण यामुळे अनेक कंपन्या आणि विद्यार्थ्यांची गैरसोयही होतेय.

हार्दिक पटेलांचं उपोषण सुरू

या आंदोलनाचं नेतृत्व करणारा हार्दिक पटेल मंगळवारी रात्रीपासून उपोषण सुरू केलंय. आरक्षणाच्या मागणीवर ठाम असल्याचं त्यानं स्पष्ट केलंय. मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल या पटेल समाजाच्या असल्यामुळे त्या नक्की आमच्या व्यासपीठावर येतील असा विश्वास त्यानं व्यक्त केलाय. तसंच आमच्या मागण्या होण्यासाठी आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाला बरोबर घ्यायला तयार आहोत असं त्याचं म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 26, 2015 10:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close