S M L

दाऊदचा आर्थिक कणा मोडणार, केंद्राचा नवा प्लॅन ?

Sachin Salve | Updated On: Aug 26, 2015 12:39 PM IST

 Dawood Photo orignal photo26 ऑगस्ट : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या संपत्तीवर टाच आणण्याची खास योजना केंद्र सरकार बनवत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. दाऊदला वठणीवर आणण्याचे असेल तर त्याचा आर्थिक कणा मोडला पाहिजे. यासाठी आता अमेरिकेसह इतर देशांची मदत घेतली जाणार आहे.

भारताचा मोस्टवाँटेड दाऊद इब्राहिमला ताब्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहे पण याचा एक भाग म्हणून केंद्र सरकारने दाऊदच्या संपत्तीला सुरुंग लावण्याचं नियोजन केलंय. भारतासह दाऊदची दुबई, युएई, सौदी अरेबिया आणि पाकिस्तानात मालमत्ता आहे. रिअल ईस्टेट, पायाभूत सुविधा, हॉटेल्स, मॉल्स यासारख्या व्यवसायांमध्ये दाऊदची मोठी गुंतवणूक आहे. कराचीमध्ये बसून दाऊद हा आर्थिक पसारा सांभाळतो. दाऊदला जेरीस आणायंच असेल तर त्याचा आर्थिक कणा मोडायला हवा. त्यासाठीच त्याची आर्थिक कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी अमेरिकेसह इतर देशांची मदत घेतली जाणार आहे. 2003 मध्ये अमेरिकेनं दाऊदला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केलंय. त्यामुळे भारताने आता अमेरिकेच्या मदतीने दाऊदचा खेळ खल्लास करण्याचा प्लॅन आखलाय.

हा आहे दाऊदचा काळा कारभार

- ओऍसिस ऑईल अँड ल्युब एलसीसी - दुबई

- अल्-नूर डायमंड्स - दुबई

- ओऍसिस पॉवर एलसीसी - दुबई

- डॉल्फिन कन्स्ट्रक्शन

- ईस्ट वेस्ट एअरलाईन्स (सध्या बंद)

- किंग व्हिडिओ - दुबई

- मोईन गारमेंट्स - दुबई

दाऊदचे आर्थिक स्रोत

- ड्रग्ज तस्करी

- बनावट नोटांचं रॅकेट

- हवाला

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 26, 2015 12:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close