S M L

आणखी एक जिवंत दहशतवादी पकडला

Sachin Salve | Updated On: Aug 27, 2015 09:06 PM IST

आणखी एक जिवंत दहशतवादी पकडला

27 ऑगस्ट : नावेद उर्फ उस्माननंतर भारताने आणखी एका पाकिस्तानी दहशतवाद्याला बेड्या ठोकल्या आहे. सज्जाद असं या दहशतवाद्याचं नाव आहे.. जम्मू-काश्मीरमध्ये बारामुल्ला भागात झालेल्या चकमकीत या दहशतवाद्याला पकडण्यात आलंय. एकाच महिन्यात दुसरा दहशतवादी पकडल्यामुळे पाकिस्तान पुन्हा तोंडघशी पडलाय.

बारामुल्ला भागात राफियाबाद इथं सीमा सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत आतापर्यंत जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलंय. तर एका दहशतवाद्याला जिवंत पकडलंय. पकडलेला दहशतवादी सज्जाद असून हा 22 वर्षांचा तरुण आहे. सज्जाद हा बलुचिस्तानचा नागरिक असल्याचं कळतंय. त्याच्याकडून एके- 47 आणि स्फोटकं जप्त करण्यात आलीये. गेल्या 24 तासांपासून चकमक सुरू आहे. अजूनही जवानांचं सर्च ऑपेरशन सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच उधमपूरमधून दहशतवादी मोहम्मद नावेद उर्फ उस्मान  खानला जिवंत पकडण्यात आलं होतं. नावेद सध्या एनआएच्या ताब्यात आहे. आणि आता आणखी एक जिवंत दहशतवादी पकडण्यात आलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 27, 2015 04:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close