S M L

शीनाचा गळा कुणी आवळला?, हत्येचं गूढ अजूनही कायम

Samruddha Bhambure | Updated On: Aug 27, 2015 08:40 PM IST

शीनाचा गळा कुणी आवळला?, हत्येचं गूढ अजूनही कायम

27 ऑगस्ट : शीना बोरा हत्येप्रकरणी आज दिवसभर चौकशी चक्र फिरत होती आणि यातून बरेच नवीन नवीन खुलासे हाती येत आहेत. आपण शीनाचा गळा आवळला नाही. पण ज्या गाडीत तिचा खून झाला त्यात हजर होतो, असा जबाब इंद्राणीचा दुसरा नवरा संजीव खन्नानं दिल्याची सूत्रांची माहिती आहे. तर संजीव खन्ना आणि ड्रायव्हर श्याम राय यांनी शीनाचा गळा आवळला, असं इंद्राणीने म्हटलं आहे. पण इंद्राणी आणि संजीव या दोघांनीही शीनाचा खून केला, असा जबाब इंद्राणीचा ड्रायव्हर श्याम राय यानं पोलिसांना दिली आहे. ही जबानी आयबीएन नेटवर्कच्या हाती लागली आहे. हत्येच्या आदल्या दिवशी इंद्राणीनं आपल्याला रेकी करण्यासाठी नेलं होतं, असंही रायनं म्हटलं आहे. हत्येच्या दिवशी इंद्राणीने संजीव खन्नाला मुंबईत बोलावलं होतं, असंही त्याने सांगितलं आहे.

दरम्यान शीनाचा भाऊ मिखाईल याने या हत्येसंबंधी काही पुरावे पोलिसांना सादर केल्याचं कळतं आहे. त्याची गुवाहाटीची राजधानी दिसपूरमध्ये पोलिसांनी चौकशी केली. त्याला आज रात्री किंवा उद्या (शुक्रवारी) मुंबईला आणलं जाणार आहे. तिकडे बुधवारी रात्रीपासून या प्रकरणातल्या सर्व संशयितांची चौकशी सुरू आहे. शीनाचे कथीत प्रेमसंबंध असणार्‍या राहुल मुखर्जी जो पीटर मुखर्जीचा पहिल्या बायकोपासून असलेला मुलगा आहे त्याचीही चौकशी झाली आहे. इंद्राणीचीही एका अज्ञात स्थळी चौकशी झाली आहे. तर पीटर मुखर्जीचीही चौकशी झाली आहे. दरम्यान इंद्राणी, राहुल आणि ड्रायव्हर श्याम राय यांची एकत्र चौकशीही करण्यात आली.

राहुल आणि शीनाचं प्रेमप्रकरण वर्षभर सुरू होतं. याबाबत इंद्राणी आणि पीटर या दोघांनाही कल्पना होती. पीटर यांनी या गोष्टीला फारसं महत्त्व दिलं नाही. मात्र इंद्राणी यांना हे नातं वारंवार खटकत होतं. संपत्तीवर डोळा ठेऊन शीनाने राहुलला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलंय याची कल्पना आल्याने इंद्राणी यांनी शीनाला राहुलपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. मात्र तिने ते न ऐकल्याने इंद्राणी यांनी शीनाचा काटा काढला असावा, असाही एक संशय पोलिसांच्या तपासातून पुढे आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 27, 2015 08:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close