S M L

'स्मार्ट सिटी'च्या यादीत महाराष्ट्रातल्या 10 शहरांचा समावेश

Samruddha Bhambure | Updated On: Aug 27, 2015 08:56 PM IST

'स्मार्ट सिटी'च्या यादीत महाराष्ट्रातल्या 10 शहरांचा समावेश

27 ऑगस्ट : केंद्र सरकार देशातील 98 शहरं 'स्मार्ट' बनवणार आहे. महाराष्ट्राचा विचार केल्यास मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, सोलापूर अशा 10 शहरांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशमधील सर्वाधिक शहरांचा या यादीत समावेश आहे. त्याखालोखाल तामिळनाडू आणि महाराष्ट्रातील शहरांना यादीत स्थान मिळालंय. तर बिहार आणि आंध्र प्रदेशमधल्या प्रत्येकी 3 शहरांचा या यादीत समावेश आहे.

केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी 'स्मार्ट सिटी' योजनेसाठी निवडलेल्या शहरांची अधिकृत घोषणा केली. पाच वर्षांत या प्रकल्पावर केंद्र सरकार 48 हजार कोटी खर्च करणार आहे. पहिल्या टप्प्यात यावर्षीपासून 24 शहरांच्या स्मार्ट विकासाला प्रत्यक्षात सुरुवात करण्याचाही केंद्राचा विचार असल्याचं त्यांनी सांगितलं.

या स्मार्ट शहरांमध्ये मुबलक पाणीपुरवठा, वीजपुरवठा, घनकचरा व्यवस्थापनासह मलनिस्सारण नियोजन, सक्षम सार्वजनिक वाहतूक, परवडणारी घरं (विशेषत: गरिबांसाठी), डिजिटलायझेशन, ई-गव्हर्नन्स सह सुप्रशासन, लोकसहभाग, महिला, लहान मुलं आणि वयोवृद्धांसाठी सुरक्षितता आणि आरोग्य आणि शिक्षणाच्या सुविधाय पुरवल्या जातील.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 27, 2015 08:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close