S M L

मुस्लिमांना सुरक्षेची हमी द्या -हमीद अन्सारी

Sachin Salve | Updated On: Sep 1, 2015 05:39 PM IST

मुस्लिमांना सुरक्षेची हमी द्या -हमीद अन्सारी

01 सप्टेंबर : मुस्लिमांच्या सामाजिक स्थितीविषयी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी जाहीर चिंता व्यक्त केलीय. मुस्लिमांना सुरक्षेची हमी द्या, असं आवाहन त्यांनी केंद्र सरकारसह सर्व राज्य सरकारांना केलंय. 'ऑल इंडिया मजलिस ए मुशावरात' या संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते.

या कार्यक्रमात हमीद अन्सारी म्हणाले, सबका साथ सबका विकास ही चांगली सुरुवात आहे. वैयक्तिक, सामाजिक आणि सरकारी स्तरावर प्रत्येकानं त्याची कास धरावी. मुस्लिमांना सापत्नभावाची वागणूक मिळत असेल, त्यांना डावललं जात असेल तर राज्य सरकार आणि प्रशासनानं यात सुधारणा करायला हवी. हे लवकरात लवकर होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी योग्य साधनं विकसित करायला हवीत अशी मागणी त्यांनी केली. तसंच भारतीय मुस्लिमांसमोरच्या मुख्य समस्या आहेत. ओळख, सुरक्षा, शिक्षण, सशक्तीकरण, योजनांमध्ये समान भागिदारी आणि निर्णयप्रक्रियेत योग्य वाटा. या समस्या सोडवण्यासाठी योग्य रणनीती आणि प्रणाली विकसित करणं हेसुद्धा एक आव्हान आहे. राजकीय शहाणपण, सामाजिक शांतता आणि जनमताची भूमिका यासाठी महत्त्वाची राहील असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 1, 2015 05:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close