S M L

देशभरातील कामगार संपावर, भारत बंद !

Sachin Salve | Updated On: Sep 2, 2015 01:15 PM IST

देशभरातील कामगार संपावर, भारत बंद !

02 सप्टेंबर : केंद्र सरकारची धोरणं कामगार विरोधी आहेत असा आरोप करत आज देशभरातले कामगार संपावर गेले आहे.

सरकारी बँक कर्मचारी संघटनांचाही या संपाला पाठिंबा आहे. या संपात 10 लाख कर्मचारी सहभागी झाले आहे. संपात 2 लाख विमा कर्मचारी सहभागी आहे. त्यामुळे सरकारी बँका बंद आहेत आणि ऑनलाईन व्यवहारांवरही याचा परिणाम होतोय.

विमा क्षेत्रावरही याचा परिणाम जाणवतोय. ऊर्जा, सिमेंट, कोळसा, वस्त्रद्योग या क्षेत्रांवर या संपाचा सर्वात जास्त परिणाम झालाय. राज्यात रिक्षा आणि टॅक्सी सुरू आहेत, पण देशात काही ठिकाणी रिक्षाही बंद आहेत. बँकिंग आणि विमा व्यवसायातील सर्व संघटना, देशातील सर्व केंद्रीय संघटना आणि औद्योगिक फेडरेशनने संपात सहभागी आहे. देशातील 30 कोटी कामगार शेतकर्‍यांच्या एकजुटीच्या संघर्षात 10 लाख बँक कर्मचारी आणि 2 लाख विमा कर्मचारी सहभागी आहे. यासोबतच रिझर्व बँक, नाबार्ड, प्रादेशिक ग्रामीण बँक, आयडीबीआय, सिडबी आणि ऑल इंडिया को ऑपरेटीव्ह बॅक एम्प्लाईज फेडरेशन आणि विमा व्यवसायातील सर्व संघटना सहभागी आहेत

जे.जे. हॉस्पिटलवर परिणाम

मुंबईतल्या सर्वात मोठ्या रुग्णालयांपैकी एक असलेलं जे. जे. हॉस्पिटलमध्येही संपाचा परिणाम जाणवतोय. रुग्णालयातले वॉर्डबॉय, नर्सेस संपावर आहेत. पण रुग्णांसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आलीये. इतर विभागातले कर्मचारी रुग्णालयात वळवण्यात आले आहे. फक्त ठरवून केलेल्या शस्त्रक्रिया आज होणार नाहीत. पण आपात्कालीन शस्तक्रिया होतील. ही सर्व माहिती खुद्द जे.जेचे डीन डॉ. तात्याराव लहाने यांनी IBN लोकमतला दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 2, 2015 01:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close