S M L

मोदी सरकारच्या कारभारावर मंथन,भाजप-संघाची बैठक सुरूच

Sachin Salve | Updated On: Sep 3, 2015 01:22 PM IST

मोदी सरकारच्या कारभारावर मंथन,भाजप-संघाची बैठक सुरूच

03 सप्टेंबर : नवी दिल्लीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि आणि भाजपच्या बैठकीचा दुसरा दिवस आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर बैठकीला उपस्थित आहेत. एनडीए सरकारचं शैक्षणिक धोरण आजच्या बैठकीच्या अजेंड्यावर असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. तसंच गुजरातमधलं हार्दिक पटेलचं आरक्षण आंदोलन, धर्मनिहाय जनगणना आणि गंगास्वच्छता या मुद्द्यांवरही आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे. विकासदर साडेसात टक्क्यांवरून सात टक्क्यांवर आल्याबद्दल कालच्या बैठकीत संघानं चिंता व्यक्त केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 3, 2015 12:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close