S M L

सनीच्या कंडोमच्या जाहिरातीमुळे बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ - अतुल अंजान

Sachin Salve | Updated On: Sep 3, 2015 05:11 PM IST

सनीच्या कंडोमच्या जाहिरातीमुळे बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ - अतुल अंजान

03 ऑगस्ट : सनी लिओनच्या कंडोमच्या जाहिरातीमुळे बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होते असा अजब तर्क सीपीआयचे ज्येष्ठ नेते अतुल अंजान यांनी लावलाय. एवढंच नाहीतर सनीचे पोर्न व्हिडिओ पाहिले तर दोन मिनिटांनी उलटी झाली अशी ग्वाहीही अंजान यांनी दिली.

भारतात महिलांवर होणार्‍या बलात्काराच्या घटनांमागच्या कारणांचं विचित्र विश्लेषण करण्याची भारतीय राजकारण्यांची सवय जुनीच आहे.त्यात अजून एका नेत्याची भर पडलीये. उत्तरप्रदेशच्या गाझीपूरमध्ये झालेल्या रॅलीत सीपीआयचे ज्येष्ठ नेते अतुल अंजान यांनी अभिनेत्री सनी लिओनीच्या कंडोमच्या जाहिरातीमुळे बलात्काराच्या घटना वाढत असल्याचा जावईशोध लावलाय. ही जाहिरात चालू राहिली तर अशा घटनांमध्ये वाढ होऊ शकते असी मुक्ताफळं त्यांनी उधळली आहेत. सनी लिओनने भारतीय संस्कृतीला हानी पोहचवलीये. ती एक पोर्न स्टार असून तिचा सन्मान होऊ शकत नाही. तिच्या विरोधात सेन्सर बोर्डाकडे तक्रार करणार असंही अंजान म्हणाले. अंजान एवढ्यावरच थांबले नाही. जे कुणी सनीबद्दल सहानुभूती बाळगत असेल त्यांनी सनीची कंडोमची जाहिरात आपल्या घरी दाखवावी. कलेच्या नावाखाली काहीही खपवून घेऊ नये जर कुणाला माझ्या आक्षेपाबद्दल वाईट वाटलं असेल तर मी माफी मागतो असंही अंजान म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 3, 2015 03:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close