S M L

अखेर 'वन रँक वन पेन्शन' योजना लागू, माजी सैनिक मात्र असमाधानी

Sachin Salve | Updated On: Sep 5, 2015 09:48 PM IST

अखेर 'वन रँक वन पेन्शन' योजना लागू, माजी सैनिक मात्र असमाधानी

05 सप्टेंबर : अखेर वन रँक वन पेन्शन योजनेची घोषणा करण्यात आलीये. संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी पत्रकार परिषद घेऊन गेल्या 40 वर्षांपासून प्रलंबित वन रँक वन पेन्शन योजनेची घोषणा केलीये. 1 जुलै 2014 पासून ही योजना लागू होणार आहे. मात्र, सरकारच्या घोषणेनंतर माजी सैनिकांची नाराजी कायम असून आंदोलन सुरूच ठेवणार असं जाहीर करण्यात आलंय.

गेल्या 40 वर्षांपासून वन रँक वन पेन्शन योजनेचा मुद्दा रखडलेला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वन रँक वन पेन्शन योजना लागू करण्यात येईल असं आश्वासन दिलं होतं. अखेर आज सैनिकांच्या 40 वर्षांच्या लढ्याला यश आलंय. पर्रिकर यांनी 40 वर्षांपासून ही योजना रखडली असं कबूल करत योजनेची घोषणा केली.

या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर आता 8 ते 10 हजार कोटींचा भार पडणार आहे. आवश्यकतेनुसार यासाठी बजेट वाढवण्यात येणार आहे. यूपीए सरकारने फेब्रुवारी 2014 मध्ये या योजनेसाठी 500 कोटींचं बजेट मंजूर केलं होतं. आता हेच बजेट 8 हजार कोटींवर गेलं आहे.

पर्रिकर यांच्या घोषणेनं दिल्ली गेल्या काही दिवसांपासून आंदोलनावरअसलेल्या माजी सैनिकांनी मात्र कुठे आनंद तर कुठे नाराजी व्यक्त केलीये. सरकारने सरकारने 1 मुद्दा मान्य केला आहे तर 5 मुद्दे वगळले आहेत. तसंच स्वेच्छानिवृत्तीसंदर्भात सरकारने कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही. एक समिती नेमण्यात आली असून ती चुकीची आहे. त्या जागी पाच सदस्यांची समिती असायला हवी अशी मागणी माजी लष्करी अधिकारी सतबीर सिंग यांनी केली. आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार असून  बैठक घेऊन अधिकृत निर्णय जाहीर करू असंही त्यांनी स्पष्ट केलं.

युद्ध आमुचे सुरूच..

1. सरकारने जुलै 2014पासून वन रँक वन पेन्शन लागू केलंय, माजी सैनिकांना एप्रिल 2014पासून हवं आहे

2. दर 5 वर्षांनी पेन्शनच्या रकमेचा फेरआढावा घेतला जाईल, माजी सैनिकांना दरवर्षी फेरआढावा हवा आहे

3. VRSघेणार्‍यांना लाभ नाही, VRS घेणार्‍यांना लाभ मिळावा अशी माजी सैनिकांची मागणी

4. सरकारने एक सदस्यीयन्यायालयीन समिती नेमलीये, माजी सैनिकांना 5 सदस्यांची समिती हवी आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 5, 2015 03:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close