S M L

केंद्रीय सरकारी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात 6 टक्क्यांची वाढ

Samruddha Bhambure | Updated On: Sep 9, 2015 02:14 PM IST

केंद्रीय सरकारी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात 6 टक्क्यांची वाढ

5398318403a71.image

09 सप्टेंबर : केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात 6 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, 1 जुलै 2015पासून हा भत्ता लागू करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मोदी सरकारच्या काळात केंद्रीय कर्मचार्‍यांना 'अच्छे दिन' आले आहेत.

सरकारच्या या निर्णयाचा जवळपास 1 कोटी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लाभ होणार आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात केंद्रीय सरकारी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात सहा टक्क्यांची वाढ करण्यात आली होती. तसंच हा भत्ता 1 जानेवारी 2015पासून लागू करण्यात आला होता. सध्या केंद्रीय कर्मचार्‍यांना मूळ पगारात 113 टक्के महागाई भत्ता मिळत होता. त्यात आणखी सहा टक्क्यांची वाढ झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 9, 2015 01:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close