S M L

‘हवालाबाजां’मुळे विकासात अडथळे, मोदींचे काँग्रेसला प्रत्युत्तर

Samruddha Bhambure | Updated On: Sep 10, 2015 12:35 PM IST

Modi-Mathura-one-year-PTI10 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (गुरूवारी) काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. मोदींची आश्वासने केवळ हवाबाज असल्याची टीका सोनिया गांधीनी केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना 'हवालाबाज' विकासाच्या मार्गात अडथळे निर्माण करत आल्याची जळजळीत टीका पंतप्रधान मोदी यांनी केली.

दहाव्या विश्व हिंदी संमेलनाचे उदघाटन आज (गुरुवारी) नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. संसदेचे पावसाळी अधिवेशनात काँग्रेसच्या सदस्यांनी घातलेल्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज एकदिवसही चालू शकले नव्हते. त्यामुळे जीएसटीसारखे महत्त्वाचे विधेयक मंजूर होऊ शकले नाही. याला काँग्रेसच जबाबदार असून, हवालाबाजांमुळे देशाच्या विकास कार्यात अडथळे येत असल्याची घणाघाती टीका पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर केली.

काँग्रेसच्या आडमुठेपणामुळे विशेष अधिवेशन बोलावण्याचा प्रस्ताव मंजूर होऊ शकला नाही. काळया पैशांविरोधात सरकारने कठोर पावले उचलल्यामुळेच काँग्रेस पक्ष अस्वस्थ झाला असून, लोकसभेतील पराभवातून अजुनही हा पक्ष सावरलेला नाही, असा टोलाही पंतप्रधानांनी काँग्रेसला लगावला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 10, 2015 12:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close