S M L

सिकंदराबाद-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस घसरली, 2 ठार

Sachin Salve | Updated On: Sep 12, 2015 01:44 PM IST

सिकंदराबाद-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस घसरली, 2 ठार

12 सप्टेंबर : सिकंदराबाद- मुंबई दुरांतो एक्स्प्रेस कर्नाटकमध्ये रुळावरून घसरली. या दुर्घटनेत 2 जण ठार झाले तर 7 प्रवासी जखमी आहेत. सिंकदराबादहून ही गाडी काल रात्री 11 वाजून 5 मिनिटांनी निघाली होती. मृतांमध्ये ज्योती आणि लता या महिलांचा समावेश आहे या दोघीही हैदराबादहून पुण्याला जात होत्या.

हैदराबाद दुरांतो एक्स्प्रेसला कर्नाटकातील गुलबर्गाजवळ मर्तुर येथे रुळावरून घसरली. रेल्वेच्या सोलापूर डिव्हिजनमध्ये हा भाग येतो. या गाडीचे एकूण 9 डबे घसरले. यातल्या 7 डब्यांमध्ये प्रवासी होते, तर एक पँट्री कार आणि एक जनरेटर कार होती. पहाटे अडीचच्या सुमाराला हा अपघात झाला. बचावकार्य आता पूर्ण झालेलं आहे. या अपघातातील मृतांना 2 लाख रूपयांची त्वरीत मदत देण्याचं रेल्वे प्रशासनानं जाहीर केलंय. तर गंभीर जखमींना 50 हजार रूपये आणि किरकोळ दुखापत झालेल्यांना 25 हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. अपघातग्रस्त डब्यांसह गाडी घटनास्थळावरून आता निघालीय. या दुरांतो गाडीला एलएचबी या जर्मन कंपनीचे डबे असतात. त्यामुळे मृतांचा आकडा तुलनेनं कमी आहे. या गाड्यांचं नवं तंज्ञत्रान असं आहे की अपघात झाला तर डबे एकमेकांवर चढत नाहीत. यामुळे जीवितहानी मोठ्या प्रमाणात कमी होते. दोन डबे ज्या कपलिंगनं जोडलेले असतात, त्यात या नव्या तंत्रज्ञानानं बदल केलेत, आणि त्यामुळे जीवितहानी कमी होते. राजधानी एक्स्प्रेसलाही असेच डबे आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 12, 2015 01:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close