S M L

मध्यप्रदेश सिलेंडर स्फोटात मृतांचा आकडा 89 वर

Sachin Salve | Updated On: Sep 12, 2015 10:05 PM IST

 मध्यप्रदेश सिलेंडर स्फोटात मृतांचा आकडा 89 वर

12 सप्टेंबर :मध्य प्रदेशच्या झाबुआ जिल्ह्यात एका रेस्टॉरंटमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटात मृतांचा आकडा 89 वर पोहचला आहे. तर 80 हून अधिक जण जखमी झाले आहे. झाबुआच्या पेटलावाड भागात ही घटना घडलीय.मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्याक्त करण्यात येतेय.

झाबुआ जिल्ह्यात एका रेस्टॉरंटमध्ये सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास एलपीजी सिलेंडरचा स्फोट झाला. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की त्याच्या हादर्‍याने हॉटेलचे छप्पर कोसळले. एवढंच नाहीतर या स्फोटामुळे आजूबाजूच्या इमारतींना तडे गेलेत. स्फोटामुळे रेस्टॉरंटच्या भींती कोसळल्या, आणि ढिगार्‍याखाली अजून लोक अडकल्याची भीती आहे. झाबुआचे वरिष्ठ अधिकारी या भागात पोहोचलेत, आणि बचावकार्य जोरात सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 12, 2015 01:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close