S M L

दिल्ली विद्यापीठावर 'अभाविप'चा झेंडा, 'आप'ला धोबीपछाड

Sachin Salve | Updated On: Sep 12, 2015 03:12 PM IST

दिल्ली विद्यापीठावर 'अभाविप'चा झेंडा, 'आप'ला धोबीपछाड

12 सप्टेंबर : दिल्ली विद्यापीठाच्या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं आम आदमी पक्षाला धोबीपछाड देत झेंडा फडकावलाय. चार ही जांगा 'अभाविप'ने पटकावल्या आहे. सतेंद्र अवाना अध्यक्षपदी तर अंजली राणा सचिव, सनी डेढा उपाध्यक्ष आणि सह सचिवपदी निवड झालीये.

दिल्ली विद्यापीठाच्या निवडणुकीत मागील वर्षीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परीवार आणि भाजपाशी संलग्न असलेली विद्यार्थी संघटना 'अखिल भारतीय विद्यार्थी परिषद' म्हणजेच अभाविपने वर्चस्व राखले होते. यावेळीही अभाविपने काँग्रेस पुरस्कृत एनएसयुआय आणि आम आदमी पक्षाने पुरस्कृत सीवायएसएसचा पराभव केलाय. 'अखिल भारतीय विद्यार्थी परिषद'ने चारही जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसला चारही जागांवर दुसर्‍या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. तर आम आदमी पक्षांच्या विद्यार्थी संघटनेला अपयश आलंय. एकूण 22 उमेदवारांनी या निवडणुकीत आपलं नशीब आजमावलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 12, 2015 01:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close