S M L

राज ठाकरे यांच्या अटकेला स्थगिती : औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय

4 डिसेंबर राज ठाकरे यांच्या अटक वॉरंटला मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं चार आठवड्याची स्थगिती दिली आहे. ही स्थगिती देताना सरकार पक्षाने राज ठाकरे यांना समन्स बजावण्यात कसूर केल्याबद्दल कोर्टाने ताशेरे ओढले आहेत. चार आठवड्यात सरकार पक्षाला याबाबतच्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. परप्रांतियांच्या विरोधातल्या आंदोलनप्रकरणी राज ठाकरे यांना अटक झाली होती. त्यावेळी 21 ऑक्टोबर 2008 रोजी बदनापूर तालुक्यातल्या राजूर येथे एका बसवर मनसे कार्यकर्त्यांनी दगडफेक केली होती. बस चालकाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी राज ठाकरे यांच्याविरूध्द गुन्हा नोंदविला होता. 5 डिसेंबर 2009 रोजी राज ठाकरे यांना हजर करण्याचे आदेश बदनापूर कोर्टाने बजावले. पण पोलिसांनी याप्रकरणात राज ठाकरे यांना हजर करण्यास असमर्थता दर्शविल्याने बदनापूर कोर्टाने पोलिसांना कडक शब्दात तंबी दिली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 4, 2010 11:06 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 4, 2010 11:06 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close