S M L

शरद पवारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

Sachin Salve | Updated On: Sep 14, 2015 07:00 PM IST

शरद पवारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

14 सप्टेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. नवी दिल्लीमध्ये ही भेट झाली. राज्यामध्ये विशेषतः मराठवाड्यात पडलेल्या भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेण्यात आली.

दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारनं राज्याला आणखी मदत करावी अशी मागणी यावेळी पवारांनी मोदींकडे केल्याचं समजतं.

दरम्यान, राज्यभरात आज राष्ट्रवादीने जेलभरो आंदोलन केलं. राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यासह सर्वच नेते आंदोलनात सहभागी झाले होते. ठिकठिकाणी कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं आणि थोड्या वेळाने सोडून देण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 14, 2015 07:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close