S M L

तब्बल 70 वर्षांनंतर नेताजीसंबंधीच्या 64 गुप्त फाईल्स सार्वजनिक

Samruddha Bhambure | Updated On: Sep 18, 2015 02:19 PM IST

तब्बल 70 वर्षांनंतर नेताजीसंबंधीच्या 64 गुप्त फाईल्स सार्वजनिक

18 सप्टेंबर : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूबाबतच्या रहस्यावर अखेर पडदा पडण्याची शक्यता आहे. नेताजींच्या मृत्यूसंदर्भातील 64 गोपनीय फाईल पश्चिम बंगाल सरकारने आज सार्वजनिक केल्या आहेत. पश्चिम बंगाल सरकारजवळ असलेल्या या 64 फाईल्स 1937 ते 1947 दरम्यान तयार करण्यात आलेल्या आहेत.

आतापर्यंत गोपनीय असलेल्या फाईल्स खुल्या करण्यात आल्यामुळे नेताजींचा मृत्यू नेमका कसा झाला, याबद्दलही माहिती मिळण्यास मदत होणार आहे. पश्चिम बंगाल सरकारने काही दिवसांपूर्वीच या फाईल्स सामान्यांसाठी खुल्या केल्या जातील, असं स्पष्ट केलं होतं.

नेताजींच्या कुटुंबींयाना बोलावून या फाईल्स एका सीडीच्या स्वरुपात त्यांना देण्यात आल्या. या फाईल्समधील मजकूर कोलकाता पोलीस संग्रहालयात ठेवण्यात येणार असल्याचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितलं. गेली अनेक वर्षांपासून सरकार या फाईल्स सार्वजनिक करण्यापासून टाळाटाळ करत होतं. त्यामुळे नेताजींच्या मृत्यूमागचं खरं कारण काय हे लवकरचं सर्वांसमोर येऊ शकतं.

दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनजीर्ंनी हा फाईल्स सार्वजनिक निर्णय घेतला होता, मात्र आज नेताजींच्या कुटुंबीयांना फाईल्स देताना त्या हजर नव्हत्या. या कार्यक्रमाला राजकीय स्वरुप मिळू नये, म्हणून ममता गैरहजर राहिल्या, असल्याचं म्हटलं जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 18, 2015 02:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close