S M L

एकता यात्रा रोखली, हार्दिक पटेल पोलिसांच्या ताब्यात

Sachin Salve | Updated On: Sep 19, 2015 04:01 PM IST

एकता यात्रा रोखली, हार्दिक पटेल पोलिसांच्या ताब्यात

19 सप्टेंबर : गुजरातमध्ये पटेल समाजाला ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देणारे हार्दिक पटेल यांना आज सुरत पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांच्याबरोबर 78 कार्यकर्तेही पोलिसांच्या ताब्यात आहेत.

हार्दिक यांना आज एकता यात्रा काढायची होती, पण यासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली. पण तरीही आपण यात्रा काढणारच, असा हार्दिक यांचा आग्रह होता. त्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली. याआधी हार्दिक यांना दोन वेळा उलटी दांडी यात्रा काढण्याचा प्रयत्न केला, पण प्रशासनानं त्याला परवानगी दिली नाही. प्रशासनाला केवळ असंतोष निर्माण करायचाय, असा आरोप हार्दिक यांनी केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 19, 2015 04:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close