S M L

धक्कादायक, रस्ते कामात नजर चुकीने व्यक्तीला जिवंत गाडलं

Sachin Salve | Updated On: Sep 21, 2015 04:08 PM IST

धक्कादायक, रस्ते कामात नजर चुकीने व्यक्तीला जिवंत गाडलं

21 सप्टेंबर : मध्य प्रदेशमध्ये कटनी जिल्ह्यात एका नागरिकाला जिवंत खड्‌ड्यात गाडलं गेल्याची धक्कादायक घटना घडलीये. या दुर्घटनेत या व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना चुकून झाली, असा दावा करण्यात येतोय.

झालं असं की, कटनीमध्ये रस्त्याचं काम सुरू होतं. डांबर टाकत असताना लटोरी लाल ही व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत या रस्त्यावरून जात होती. लटोरी खड्‌ड्यात पडला. थोड्याच वेळानं एक डम्पर तिथे आला, आणि मजुरांनी खड्‌ड्यावर डांबर टाकलं. पहाटे स्थानिकांना रस्त्याच्या आतून एक हात आलेला दिसला. पोलीस तिथे आल्यावर घडलेली सगळी हकीकत समोर आली. पोलिसांनी डम्पर चालक आणि एका मजुराला अटक केलीय. तसंच कंत्राटदारालाही लवकरच अटक झाली पाहिजे, अशी मागणी विरोधक करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 21, 2015 04:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close