S M L

आरक्षण धोरणाचा नव्याने आढावा घेतला पाहिजे -भागवत

Sachin Salve | Updated On: Sep 21, 2015 05:57 PM IST

आरक्षण धोरणाचा नव्याने आढावा घेतला पाहिजे -भागवत

21 सप्टेंबर : आरक्षणाचा वापर आज राजकीय हेतू साध्य करण्यासाठी केला जात आहे त्यामुळे आरक्षण धोरणाचा नव्याने आढावा घेतला पाहिजे असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं आहे. संघाच्या पांचजन्य आणि ऑर्गनायझर मुखपत्रांमध्ये एका मुलाखतीत भागवतांनी आपली मतं माडली आहे.

गुजरातमध्ये आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना सरसंघचालक मोहन भागवत यांची संघाच्या पांचजन्य आणि ऑर्गनायझर मुखपत्रांत मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत, "लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. पण, कोणत्याही समुहाकडून आपल्या मागण्या पुर्ण करण्यासाठी दुसर्‍यांना दुखी करून दबाव टाकणे योग्य नाही. सगळ्यांना याचा फायदा झाला पाहिजे. त्यातच आपले हित आहे. त्यासाठी शासनाने संवेदनशील असणं गरजेच आहे. कोणत्याही आंदोलनाच्या अगोदर त्यावर तोडगा निघाला पाहिजे. पुढे जाण्यासाठी संघर्ष हाच रस्ता नाही तर समन्वयही असला पाहिजे. त्यामुळे पुर्ण समाजाचे हित हे आपले हित आहे अशी भावना राज्यकर्त्यांची असली पाहिजे असं मत भागवत यांनी व्यक्त केलं.

तसंच संविधानात मागास जातीला आरक्षण देण्यात आलं. पण त्याचा उपयोग राजकीय हेतू साध्य करण्यासाठी होत आहे. त्यामुळे आरक्षणाचे मुद्दे उपस्थित होत आहे. संविधानात आरक्षणाची मुद्दा टाकण्यात आला तेव्हा पासून यावर राजकारण सुरू आहे. आता आरक्षणाचा आढावा घेतला पाहिजे. आणि त्यासाठी समिती स्थापन केली पाहिजे. या समितीत राजकीय प्रतिनिधींसह समाजासाठी काम करण्यार्‍या व्यक्तींचाही समावेश असावा. ही समिती निश्चित करेल की कुणाला किती आणि कधी पर्यंत आरक्षण दिले पाहिजे. याचा निर्णय ही समिती घेईन अशी सुचनाही भागवत यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 21, 2015 05:57 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close