S M L

शतकातलं सर्वात मोठं कंकणाकृती सूर्यग्रहण

15 जानेवारी दशकातलं पहिलं कंकणाकृती सूर्यग्रहण राज्यात दिसंल. हे ग्रहण मुंबई आणि महाराष्ट्रात खंडग्रास स्वरुपात होतं. ग्रहण पाहण्यासाठी आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी खगोल अभ्यासक आणि सर्वसामान्यांमध्ये मोठी उत्सुकता होती. हे कंकणाकृती सूर्यग्रहण तामिळनाडूतल्या धनुष्यकोडी इथे तब्बल दहा मिनिटं दिसलं. तर मुंबई आणि महाराष्ट्रात मात्र हे ग्रहण खंडग्रास स्वरुपात 70 टक्केच दिसलं. ग्रहण ही शास्त्रज्ञांसाठी मोठी पर्वणीच असते. आफ्रिका खंडाच्या मध्यापासून सुरू होणारं हे सूर्यग्रहण हिंदी महासागर, दक्षिण भारत, उत्तर श्रीलंका, बांगलादेश, ब्रम्हदेश आणि दक्षिण चीनपर्यंत दिसलं. दक्षिण भारतातलं धनुष्यकोडी हे सूर्यग्रहणाच्या या संपूर्ण पट्‌ट्याचा केंद्र बिंदू होतं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 15, 2010 11:32 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 15, 2010 11:32 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close