S M L

गोव्यातील सनातनचं आश्रम बंद करा, स्थानिकांनी मागणी

Sachin Salve | Updated On: Oct 1, 2015 05:52 PM IST

गोव्यातील सनातनचं आश्रम बंद करा, स्थानिकांनी मागणी

1 ऑक्टोबर : सनातन संस्थेच्या विरोधाचे सूर अधिकच तीव्र होऊ लागले आहे. गोव्यातल्या रामनाथी इथं असलेल्या सनातन संस्थेचा आश्रम बंद करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

सनातन ज्या प्रकारच्या कारवाया करतंय त्यामुळं तातडीनं हा आश्रम बंद करण्यात यावा अशी मागणी रामनाथ युवक संघाचे अध्यक्ष सौरभ लोटलीकर यांनी केलीय.

अशा प्रकारचं पत्र त्यांनी गोवा सरकारलाही दिलं आहे. आठवडाभरात निर्णय घेतला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही लोटलीकर यांनी दिलाय. सनातन ज्या प्रकारचं हिंदूत्व सांगतं ते आम्हाला मान्य नाही. स्थानिक लोकांचा सनातनला पाठिंबा नाही असंही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 1, 2015 05:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close