S M L

दादरीमध्ये झालेली हत्या सुनियोजीत - ओवैसी

Samruddha Bhambure | Updated On: Oct 2, 2015 06:11 PM IST

owasisi

02 ऑक्टोबर : दादरीमध्ये झालेली हत्या हा एक अपघात नसून कट करुन विचारपूर्वक केलेला खून असल्याचा आरोप एमआयएमचे खासदार असादुद्दीन ओवेसी यांनी केला आहे. ओवैसी यांनी या कुटुंबियांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या मुलाच्या मृत्यूवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करून शोक व्यक्त केला पण महंमद अखलाखच्या मृत्यूची दखल पंतप्रधानांनी घेतली नाही. 'सबक साथ, सबका विकास' चा दावा करणार्‍या मोदींचा फोलपणा यातून समोर आला असल्याचं ओवेसी म्हणाले. तसंच महंमद अखलाखची सुनियोजित कटातून हत्या करण्यात आल्याचा दावाही ओवेसी यांनी केला आहे. मात्र मोदींना दादरी प्रकरणाशी काहीही घेण देणं नाही का, असा सवाल उपस्थित केला आहे.

नवी दिल्लीपासून अवघ्या 45 किमी अंतरावर असलेल्या बिसारा गावात महंमद अखलाख याची दोन दिवसांपूर्वी क्षुल्लक कारणाने हत्या करण्यात आली. अखलाख याने घरात गोमांसाचा साठा करून ठेवल्याची माहिती पसरताच गावकर्‍यांनी अखलाखच्या घरावर चाल करून त्याला बेदम मारहाण केली. गावकर्‍यांच्या मारहाणीत मोहमंद अखलाख यांचा मृत्यू झाला. तर, त्यांचा मुलगा गंभीर जखमी आहे. त्यानंतर अखलाख कुटुंबियांच्या घरात गोमांसाचा साठा होता ही अफवा असल्याचं समोर आलं. या हल्ल्याप्रकरणी आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 2, 2015 06:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close