S M L

...तरच सनातनच्या आश्रमावर कारवाई -गोव्याचे मुख्यमंत्री पार्सेकर

Sachin Salve | Updated On: Oct 3, 2015 02:54 PM IST

...तरच सनातनच्या आश्रमावर कारवाई -गोव्याचे मुख्यमंत्री पार्सेकर

parasekar03 ऑक्टोबर : गोव्यातल्या रामनाथी इथं असलेल्या सनातन संस्थेचा आश्रम बंद करण्याची मागणी स्थानिक नागरिक करत आहे. यावर गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी यावर बोलण्यास तुर्तास नकार दिलाय. काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाई करू असं पार्सेकर यांनी स्पष्ट केलं.

सनातन आश्रमावरचे आरोप गंभीर असून या आश्रमाबाबतची चौकशी सुरू झालीय. प्रकरणाच्या तपासात अडथळे येऊ नयेत म्हणून यावर अधिक भाष्य करणं योग्य नसल्याचं पार्सेकर म्हणाले.

तसंच, सनातनच्या बाबतीत काही आक्षेपार्ह आढळल्यासं कारवाई करू असं आश्वासनही त्यांनी दिलं.

सनातन ज्या प्रकारच्या कारवाया करतंय. त्यामुळे तातडीनं हा आश्रम बंद करण्यात यावा अशी मागणी रामनाथ युवक संघाचे अध्यक्ष सौरभ लोटलीकर यांनी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 3, 2015 02:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close