S M L

गोहत्या बंदीला गांधींनी केला होता कडाडून विरोध

Sachin Salve | Updated On: Oct 7, 2015 11:17 AM IST

गोहत्या बंदीला गांधींनी केला होता कडाडून विरोध

07 ऑक्टोबर : उत्तर प्रदेशातल्या दादरीमध्ये इखलाक नावाच्या मुस्लीम व्यक्तीची जमावाने हत्या केली. इखलाकने बीफ खाललं, अशी अफवा पसरल्यामुळे ही हत्या झाली. त्यावरून आता उत्तर प्रदेश आणि देशभरात पुन्हा गोहत्या बंदीचा मुद्दा ऐरणीवर आलाय. पण अलीकडेच एका वेबसाईटने महात्मा गांधीजींचं याविषयीचं मत उजेडात आणलं. महात्मा गांधींनी गोहत्येला कडाडून विरोध केला होता.

भारतात गोहत्या बंदीचा कायदा होऊ शकत नाही. हिंदूंसाठी गोहत्या निषिद्ध आहे, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. गोसेवेचं व्रत मी अनेक वर्षांपासून स्वीकारलं आहे, पण माझा धर्म सर्व भारतीयांचा कसा असू शकेल? ही तर हिंदू नसलेल्या भारतीयांवर बळजबरी होईल असं परखड मत गांधीजींनी नोंदवलं होतं.

तसंच भारत हा फक्त हिंदूंची भूमी आहे, हे हिंदूंचे गृहितक चुकीचे आहे. इथे जे राहतात, भारत त्या सर्वांचा आहे असे कानही गांधीजींनी हिंदू धर्मीयांचे टोचले होते.

 25 जुलै 1947 सालच्या सर्वधर्म प्रार्थनेच्या वेळी गांधींजी नेमकं काय म्हणाले होते ?

"मला एका मित्राने टेलिग्राम करून कळवलं की, त्याने गोहत्या बंदीसाठी उपोषण सुरू केलंय. भारतात गोहत्या बंदीचा कायदा होऊ शकत नाही. हिंदूंसाठी गोहत्या निषिद्ध आहे, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. गोसेवेचं व्रत मी अनेक वर्षांपासून स्वीकारलं आहे, पण माझा धर्म सर्व भारतीयांचा कसा असू शकेल? ही तर हिंदू नसलेल्या भारतीयांवर बळजबरी होईल.

आपण मोठमोठ्याने ओरडून सांगतोय की, धर्माच्या बाबतीत बळजबरी होणार नाही. आपण प्रार्थनेच्या वेळी कुराणातल्या आयत म्हणतो, पण त्या म्हणण्यासाठी कुणी बळजबरी केली तर मला ते आवडणार नाही. जोपर्यंत एखादा माणूस गोहत्या न करण्यास प्रवृत्त होत नाही, तोवर मी त्याला बळजबरी कशी करू? भारतात फक्त हिंदूच नाहीत तर मुस्लीम, पारसी, ख्रिश्चन आणि इतर धर्मांचे लोकही राहतात. आता भारत हा फक्त हिंदूंची भूमी आहे, हे हिंदूंचे गृहितक चुकीचे आहे. इथे जे राहतात, भारत त्या सर्वांचा आहे.

शिवाय भारतात काही श्रीमंत हिंदू व्यापारी गोहत्येला प्रोत्साहन देतात. तसंच मी एका धार्मिक वैष्णव हिंदू माणसाला ओळखतो, जो स्वतःच्या मुलांना बीफ सूप देतो. मी विचारल्यावर तो म्हणाला की, औषध म्हणून बीफ खाणं पाप नाही.

खरा धर्म काय आहे याचा विचार आपण करत नाही आणि फक्त गोहत्या बंदी करा, अशी ओरड करतो. गावांकडे हिंदू लोक बैलांच्या पाठीवर मोठाली वजनं ठेवतात आणि त्यांना दाबून टाकतात. ही हळूहळू केलेली गोहत्याच नाही का?

मी पुन्हा सांगतो की, भारतात आज सगळ्या धर्मांची परीक्षा आहे. हिंदू, मुस्लीम आणि ख्रिश्चन कसे वागतात, हे आता पाहावं लागेल. पाकिस्तान मुस्लिमांचा असेलही, पण भारत मात्र सगळ्यांचा आहे."

महात्मा गांधी,

25 जुलै 1947.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 7, 2015 09:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close