S M L

राज्याचा सर्वांगीण विकास : सरकारचा दावा फोल

28 जानेवारी राज्याचा सर्वांगीण विकास होत असल्याचा सरकारचा दावा फोल ठरला आहे. राज्यातील जिल्ह्यांमध्ये दरडोई उत्पनांत प्रचंड तफावत निर्माण झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या नांदेड जिल्ह्यांसह बारा जिल्हे सरकारने अतिमागास जिल्हे म्हणून घोषित केले आहेत. या जिल्ह्यांचा विकास करण्यासाठी जिल्ह्यांत मानव विकास योजना लागू करण्यात आली आहे. राज्यात 35 जिल्ह्यांपैंकी 25 जिल्ह्यांचा मानव विकास निर्देशांक राज्याच्या सरासरीपेक्षा कमी आहे. त्यातही 12 जिल्ह्यांचा मानव विकास निर्देशांक 0.43 पेक्षाही कमी आहे. या बारा जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा नांदेड जिल्ह्यासह परभणी, हिंगोली, जालना आणि उस्मानाबाद या मराठवाड्यांतल्या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर आत्महत्याग्रस्त यवतमाळ, वाशीम, बुलढाणा, चंद्रपुर आणि गडचिरोली या विदर्भातील जिल्ह्यांचा समावेश आहे. तसंच उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि नंदुरबार हे जिल्हे सुद्धा अतिमागास ठरलेले आहेत. याच बारा जिल्ह्यांचा विकास करण्याचं काम सरकारने आता हातात घेतलं आहे. राज्याचा मानव विकास निर्देशांक जितका चांगला तितका त्या राज्याचा सर्वांगीण विकास झाला असं म्हटलं जातं. मुंबईचा मानव विकास निर्देशांक एक आहे. पण राज्याचा मानव विकास निर्देशांक मात्र 0.58 इतकाच आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 28, 2010 08:40 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 28, 2010 08:40 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close