S M L

बिहारमध्ये दुसर्‍या टप्प्यातील मतदान सुरू

Samruddha Bhambure | Updated On: Oct 16, 2015 08:57 AM IST

बिहारमध्ये दुसर्‍या टप्प्यातील मतदान सुरू

16 ऑक्टोबर : बिहारमध्ये विधानसभेच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. दुसर्‍या टप्यामध्ये 6 जिल्ह्यातील 32 जागांसाठी मतदान होत आहे. अतिसंवेदनशील अशा 11 जागांवर दुपारी तीन वाजपर्यंत तर 12 जागांवर 4 वाजेपर्यंत मतदान होईल. तर फक्त 9 जागांसाठी दुपारी 5 वाजपर्यंत मतदान होईल.

हे सर्व जिल्हे नक्षलग्रस्त असल्याने या भागात अभूतपूर्व सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे. या सहा जिल्ह्यांमध्ये सुरक्षा दलाच्या 993 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत.

विधानसभेच्या आज होणार्‍या दुसर्‍या टप्प्यातील मतदानासाठी वेगवेगळ्या पक्षांचे अनेक दिग्गज नेते त्यांचे नशिब आजमावणार आहेत. यामध्ये माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी, प्रेम कुमार आणि राजेंद्र सिंह यांचा सामावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 16, 2015 08:57 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close