S M L

राष्ट्रीय न्यायिक आयोग घटनाबाह्य - सुप्रीम कोर्ट

Samruddha Bhambure | Updated On: Oct 16, 2015 01:18 PM IST

Supreme_Court_of_In_620444f

16 ऑक्टोबर : सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी नेमलेला आयोग घटनाबाह्य आहे, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. त्यामुळे राष्ट्रीय न्यायिक आयोगाच्या माध्यमातून नियुक्ती करण्याच्या केंद्र सरकारचा निर्णयाला दणका देत, यापुढेही न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी कॉलेजियम पद्धतच सुरू राहणार असल्याचं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे.

न्यायाधीशांची नियुक्ती करण्यासाठी पूर्वी कॉलेजियमपद्धत वापरली जात होती. मात्र गेल्या वर्षी मोदी सरकारने ही पद्धत बंद करुन न्यायिक नियुक्ती आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी कायदे कार्यकारी मंडळाने मंजुरी दिली होती. मात्र यामुळे सुप्रीम कोर्टाच्या स्वातंत्र्यावर गदा येण्याची शक्यता असल्याची भीती व्यक्त करत काही वकिलांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. त्यावर सुप्रीम कोर्टाने या आयोगालाच घटनाबाह्य ठरवत केंद्र सरकारला दणका दिला आहे. त्यामुळे यापुढेही न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी कॉलेजियम पद्धतच सुरू राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. कॉलेजियम पद्धतीतील सुधारणेसाठी पुढील सुनावणी 3 नोव्हेंबररोजी होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 16, 2015 01:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close